शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वाघांच्या अभिरक्षणासाठी ट्रॅप कॅमे-यांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 19:09 IST

गतवर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे.

गणेश वासनिकअमरावती : गतवर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, अधिक वाढीसह अभिरक्षणावर भर दिला जात आहे. त्यानुसार विदर्भात एकूणच व्याघ्र प्रकल्पात जानेवारीमध्ये ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या सूचनांचे याद्वारे पालन करण्यात येणार आहे. विदर्भात ताडोबा-अंधारी, मेळघाट, पेंच, नवेगाव बांध, बोर, टिपेश्वर, काटेपूर्णा, ज्ञानगंगा आदी व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात वाघांच्या अभिरक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी २०१८ मध्ये जाहीर केलेल्या व्याघ्र गणनेच्या आकडेवारीनुसार राज्यात ३१२ वाघ असल्याची नोंद करण्यात आली आहे. आता देशभरात २०२० मध्ये सर्वांगीण व्याघ्र गणना होणार आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांचे अभिरक्षण, संवर्धनावर भर दिला जाणार आहे.राज्यात वाघांनी ४०० पेक्षा अधिक आकडेवारी गाठावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परिणामी वाघांची शिकार, अवयवांची तस्करी रोखण्यासाठी प्रामुख्याने मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रक ल्पात ‘टायगर क्राइम सेल’ आणि ‘टायगर प्रोटेक्शन फोर्स’ गठित करण्यात आले. वाघांच्या बारीकसारीक  हालचाली टिपण्यासाठी अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसविण्याबाबत एनटीसीएच्या सूचना आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्प संचालकांनी ट्रॅप कॅमे-यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार २.७० लाख हेक्टरवरमेळघाटात वाघांची संख्या नेमकी किती, याबाबत निश्चिती होऊ शकली नाही. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ४५ पेक्षा अधिक वाघ असल्याचे व्याघ्र गणनेअंती स्पष्ट झाले. हा व्याघ्र प्रकल्प द-याखो-यांत विस्तारलेला आहे. व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ २.७० लाख हेक्टर आहे. यात १.५० लाख हेक्टर कोअर परिसर, तर बफर झोन १.२० लाख हेक्टर आहे. मेळघाट बफर, गुगामल, अकोट व सिपना अशा चार विभागांत मेळघाट व्याघ्र प्रकल्प विस्तारलेला आहे. -----------------मेळघाट व्याघ्र प्रक ल्पात हल्ली ४०० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. नव्याने ३०० कॅमे-यांची आवश्यकता असून, एनटीसीएकडे प्रस्ताव पाठविला आहे. निधी प्राप्त होताच ट्रॅप कॅमेरे बसविले जातील.  - एम.एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.