शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारूअभावी गुंगीच्या औषधांवर भर; अमरावती जिल्ह्यात २६ औषधविक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:35 IST

सध्या दारूची दुकाने बंद असल्याने व्यसनाधीन नागरिक नशा करण्याकरिता गुंगीचे (झोप येण्याचे) औषध वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देनशेसाठी गुंगीच्या औषधींचा वापर११५ मेडिकल स्टोअरची तपासणी

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात औषध प्रशासन विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६ किरकोळ औषधविक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कारवाई लॉकडाऊन कालावधीत औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त मनीष गोतमारे यांनी केली आहे. २२ मार्च ते २४ एप्रिल दरम्यान एफडीएच्या पथकाने जिल्ह्यातील ११५ मेडिकल स्टोअर तपासले. यादरम्यान नियमांचे उल्लघंन करणाºया किरकोळ औषधविक्रेत्यांना नोटिसी बजावण्यात आल्या.सध्या दारूची दुकाने बंद असल्याने व्यसनाधीन नागरिक नशा करण्याकरिता गुंगीचे (झोप येण्याचे) औषध वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या औषधींची मागणीही वाढली आहे. त्याअनुषंगाने या औषधांची गैरमागार्ने विक्री होऊ नये, कुठल्याही औषधविक्रेत्याने सदर औषधाची विक्री डॉक्टराच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय करू नये, असे तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी बजावले.गुंगीच्या औषधींचे पाच ते सहा कंपन्यांचे ब्रॅन्ड मार्केटमध्ये उपलब्ध असल्याची माहिती पुढे आली. औषधविक्री करताना ग्राहकांना बिल देण्यात येते की नाही, औषधी दुकानांची स्वच्छता ठेवण्यात येते का तसेच चढ्या दराने सॅनिटायझरची विक्री होत आहे का, यासंदर्भातही तपासणी करण्यात आली. चढ्या दराने सॅनिटायझरच्या विक्रीप्रकरणी दोन ठिकाणी कारवाईसुद्धा करण्यात आल्याची माहिती गोतमारे यांनी दिली.कोरोना आजारासंदर्भात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांचीसुद्धा मागणी वाढली आहे. त्याचीसुद्धा डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय विक्री करू नये, असे औषधविक्रेत्यांना बजावण्यात आले. जिल्ह्यात १४०० किरकोळ, तर ४०० घाऊक औषधविक्रेते आहेत.

बाजारातील साठा केला कमीहायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा स्टॉक मार्केटमध्ये कमी करण्यात आलेला आहे. तूर्तास शहरातील बाजारात पाच हजार टॅबलेट उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाकडे हे औषध मुबलक प्रमाणात आहे. जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये ३० ते ४० हजार टॅबलेट उपलब्ध असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.दारूची दुकाने बंद असल्याने गुंगी आणणाऱ्या औषधांची मागणी वाढली. औषधविक्रेत्यांनी त्या डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय विकू नये. सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा साठा बाजारात कमी करण्यात आला असला तरी शासकीय रुग्णालयात हे औषध मुबलक प्रमाणांत उपलब्ध आहे.- मनीष गोतमारे, प्रभारी सहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग, अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस