शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात अमरावतीत एल्गार, विविध संघटनांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 21:39 IST

केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात गुरुवारी जिल्ह्यात हजारो मोर्चेकरी एकवटले.

 अमरावती - केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात गुरुवारी जिल्ह्यात हजारो मोर्चेकरी एकवटलेत. ‘हम भारत के लोग’ असे म्हणत त्यांनी  नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात  जिल्हा कचेरीवर धडक दिली. अचलपूर, परतवाडा, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी येथेही तहसील व उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून विरोध करण्यात आला. या मोर्चात मुस्लिम समुदायाची उपस्थिती लक्षणीय होती. अमरावती येथे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मूक मोर्चा निघाला. भारत मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती पार्टी, जमियत उलेमा-ए-हिंद, भीम आर्मी, महामानव संघटना, बारा बलुतेदार संघटना, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, ओबीसी महासभा, आप, टिपू सुल्तान ब्रिगेड, टिपू सुल्तान सेना, एमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लिग, युथ मुस्लिम लिग, पहल फाऊंडेशन (बडनेरा), विदर्भ उर्दू साहित्य समिती आदी ३६ संघटनांचा यात सहभाग होता. मोर्चेक-यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. यावेळी मोर्चेक-यांनी विविध घोषणा फलकांद्वारे आपल्या समस्येकडे लक्ष वेधले. हा मूक मोर्चा जिल्हा कचेरीवर पोलिसांनी अडविला.यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना मागणीचे निवेदन सादर केले. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी मोर्चातील प्रमुख वक्त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सदर अन्यायकारक विधेयक रद्द करण्याची मागणी केली. बडनेरा शहरातही नागरिकत्व संशोधन विधेयकाला विरोध करण्यात आला. पाण्याच्या टाकीवर चढून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सीएबी/सीएएस २०१९ विधेयक रद्द करण्याची मागणी केली. हातात राष्ट्रध्वज अन् फलकनागरिकत्व संशोधन विधयेकाविरोधात १९ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकºयांच्या हाती राष्ट्रध्वज आणि मागणीचे फलक झळकत होते. ‘हम भारत के लोग’, ‘भारत हमारी जन्मभूमी है’ असे लक्षवेधी फलक नागरिकांचे लक्ष वेधणारे ठरले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्तनागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात तीव्र विरोध दर्शविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गुरुवारी जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता इर्र्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर हे स्वत: या मोर्चावर लक्ष ठेवून होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmravatiअमरावती