शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती दत्तक योजना फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:01 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री आणि सुंदरमाला नामक चार हत्तीणी आहेत. या चारपैकी कुणालाही किंवा या चौघींनाही दत्तक घेता येते. ही दत्तक योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांना कोणीही दत्तक घेतलेले नाही. या चौघीही पालकांच्या शोधात आहेत. पण, त्यांना पालक मिळालेले नाहीत.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत हत्ती दत्तक योजना फसली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत राज्यमंत्री बच्चू कडूंचा अपवाद वगळता  या हत्तींना दत्तक घ्यायला कोणीही पुढे आलेले नाही. २२ फेब्रुवारी २०१८ ला स्थापना दिनी हत्ती दत्तक देण्याचा निर्णय मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने घेतला. २१ हजार ५०० रुपयांमध्ये एक महिन्याकरिता एक हत्ती दत्तक देण्याचे निश्चित केले गेले. ज्या कुणाला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीकरिता हत्तीला दत्तक घ्यायचे असेल, त्याला त्यापटीत रक्कम मोजावी लागते. ही दत्तक विधानाची रक्कम व्याघ्र संवर्धन फाउंडेशनकडे भरावी लागते. हत्ती दत्तक घेणाऱ्याला त्या रकमेवर ८० जी अंतर्गत आयकरात सूटही देण्याची तरतूद आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री आणि सुंदरमाला नामक चार हत्तीणी आहेत. या चारपैकी कुणालाही किंवा या चौघींनाही दत्तक घेता येते. ही दत्तक योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांना कोणीही दत्तक घेतलेले नाही. या चौघीही पालकांच्या शोधात आहेत. पण, त्यांना पालक मिळालेले नाहीत.

‘वॉन्ट टू ॲडॉप्ट अ’ मेलघाट का हाथी?’ग्रीन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ‘वॉन्ट टू ॲडॉप्ट अ मेलघाट का हाथी?’ असे फलक व्याघ्र प्रकल्पाच्या कोलकास परिसरात झाडावर लागले आहेत. याच ठिकाणी जयश्री, सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी वास्तव्याला आहेत. या दत्तक योजनेतून हत्तीला लागणारा आहार, त्यावर शासनाचा होणारा खर्च हत्ती स्वतःच काढणार आहे.

चंपाकली नशीबवानचंपाकली मात्र यात नशीबवान ठरली. एक महिन्यापुरते का होईना, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या रूपाने चंपाकलीला पालक मिळाले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक वर्षापूर्वी एक महिन्याकरिता चंपाकलीला दत्तक विधानाची रक्कम भरून दत्तक घेतले होते. तेव्हा त्यांच्या अर्धांगिनी नयना कडू  यादेखील या दत्तक विधानात सामील होत्या.

पालकाची ओळख हत्तीलाहत्ती दत्तक घेतल्यानंतर दत्तक कालावधीत तो त्या पालकांच्या नावाने ओळखला जातो. या कालावधीत दत्तक हत्तीला भेटण्याची मुभा त्या पालकांना राहते. याकरिता पालक मेळघाटात पोहोचल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था व्याघ्र प्रकल्पाकडून विनामूल्य केली जाते. तथापि, दत्तक हत्ती  पालकांना आपल्या घरी नेता येत नाही.

 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पBacchu Kaduबच्चू कडू