शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

विंधन विहिरीचे वीज देयक नागरिकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांचे जाळे आहे.

ठळक मुद्देमहापालिकेला खर्च झेपवेना । नवीन हातपंपामध्येही आता २०० मीटर अंतराची अट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात भूजलाच्या अमर्याद उपशावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन विंधन विहिरी व हातपंपाबाबत महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन विंधन विहिरीला जुन्या हातपंपापासून २०० मीटरची अट निश्चित करण्यात आली, तर अस्तित्वातील महापालिकेच्या विंधन विहिरीच्या वीजदेयकाचा खर्च नागरिकांच्या माथी मारण्यात आलेला आहे.महानगरात वैयक्तिक घरगुती पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. शहरात पाणीपुरवठ्यासाठी महापालिका व मजीप्रा या शासनाच्या दोन यंत्रणा आहेत. महापालिकेची उद्याने, दवाखाना व इतर सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. राज्य शासनाने २५ जून २०१८ रोजी अधिसूचना काढून भूजलाच्या अमर्याद उपशावर नियंत्रण तसेच एकात्मिक पद्धतीने विकास व व्यवस्थापन होण्यासाठी तसेच जमिनीखालील सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे जतन करण्याच्या अनुषंगाने हरकती मागितल्या होत्या. अद्याप ही प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. मात्र, या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत.सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांचे जाळे आहे. मात्र, ज्या भागात महापालिकाद्वारे मोफत पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणी नागरिक मजीप्राची जोडणी घेत नाहीत. परिणामी मजीप्राने वीज जोडणीच केलेली नाही. सद्यस्थितीत शहरात ३७७९ हातपंप व ४०६३ विंधन विहीरी आहेत. तरीही नगरसेवकांद्वारे या विषयाची वाढती मागणी आहे. यामुळे वीज देयकांमध्ये वाढ होऊन भूजलात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत चर्चेला आलेल्या प्रशासकीय विषयान्वये यावर आता बंधन घालण्यात आलेली आहे. मात्र, महापालिकेचे उद्यान, कार्यालये, दवाखाने व स्मशानभूमी किंवा सार्वजनिक वापराच्या जागा येथे अत्यंत आवश्यकता असल्यासएक हातपंप किंवा विद्यृत पंपासह बोअरवेल देण्याबाबत सदस्यांनी सहमती दर्शविली आहे.महापालिकेच्या ७६४ विंधन विहीरीमहापालिकेच्या महादेवखोरी परिसरात ४४५ व म्हाडा कॉलनी येथे ३१९ विंधन विहिरींद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. यासाठी तीन पंप आॅपरेटर आणि कनिष्ठ लिपिक वीज देयकाची नोंद व देयक सादर करण्यासाठी आहेत. महानगरात ३७७९ हातपंप व विंधन विहिरींवर २८४ वीज पंपाचे कनेक्शन आहे. या देयकापोटी दरमहा पाच लाखांवर खर्च येतो. प्रतिघर ६८ रुपये घेण्याचा महापालिकेचा ठराव आहे. परंतु, नागरिकांकडून देयक भरण्यास टाळाटाळ केली जाते.देयक भरण्यास महापालिकेचा नकारमहापालिकेने घेतलेल्या ठरावान्वये यापुढे विंधन विहिरींवर महापालिकेद्वारे वीज पंप बसविण्यात येणार नाही. हे देयक आता पाण्याचा वापर करणारे संबंधित नागरिक किंवा सेवाभावी संस्था यांनी भरावे. काही ठिकाणी ग्रुप कनेक्शन करून देयक भरावे. महापालिका यापुढे कोणतेही वीज देयक भरणार नाही, असा ठराव करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी मजीप्राची जलवाहिनी नाही व नैसर्गिक टंचाईचा भाग आहे, अशाच ठिकाणी हातपंप बसविण्यात येणार आहे. नवीन हातपंप मंजूर करावयाचा असल्यास जुन्या हातपंपापासून किमान २०० मीटर अंतर अनिवार्य आहे.

टॅग्स :Waterपाणी