अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतीपदाची मुदत २ आॅक्टोबर रोजी संपत असल्याने १ आॅक्टोबर रोजी नव्या सभापतींची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर विषय समिती सभापतीपदाची नव्याने निवड होणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने तयारी सुरु केली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड २१ सप्टेंबरला पार पडली. विषय समिती सभापतीपदाची अडीच वर्षांची मुदत संपल्याने निवडणूक जाहीर करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड होणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत विद्यमान सदस्यांमधून समाज कल्याण समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती पदांसाठी १ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद सभापतींची निवडणूक
By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST