शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच-उपसरपंचांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:01 IST

सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके  सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जाणार आहेत. 

ठळक मुद्देशुक्रवारी पुन्हा १३२ ग्रामपंचायतमध्ये निवड, अनेक ठिकाणी नवी समीकरणे, जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी १८ फेब्रुवारीपर्यंत निवडले जाणार नवे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वत्रिक निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींपैकी गुरुवारी १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये तहसीलदारांनी नेमलेल्या अध्यासी अधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके  सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जाणार आहेत. दरम्यान, वरूडमधील  पुसला, घोराड, हातुर्णा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच, तर वडाळा, ईत्तमगाव, पवनी  येथे भाजप समर्थित सरपंच विराजमान झाले. राष्ट्रवादीला मांगरूळी आणि महाविकास आघाडीला आमनेर आणि कुरळीचे सरपंचपद मिळाले. देऊतवाड्यात काँग्रेस-भाजप युतीचा सरपंच विराजमान झाल्याचा दावा स्थानिक स्तरावरून करण्यात आला. दर्यापूर तालुक्यातील करतखेडा येथील पाच सदस्यपदे रिक्त असल्याने सभा गठित झाली नाही. याच तालुक्यातील सासन रामापूर येथे सरपंचपदासाठी अर्ज प्राप्त झाला नाही. अचलपूर तालुक्यातील वडनेर भुजंग येथील सरपंचपद रिक्त राहिले. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजीदेखील १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडले जाणार आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत ही सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींमधील राजकीय स्थितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. १४ ग्रामपंचायती आधीच अविरोध झाल्या आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच