शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

नप निवडणुकीत भाजपात बंडाळीची शक्यता !

By admin | Updated: November 2, 2016 00:27 IST

नगरपरिषदेची पंचवार्षिक ची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी १५ : नगरसेवकांकरिता १६४ उमेदवारी अर्ज वरुड : नगरपरिषदेची पंचवार्षिक ची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह काही आघाडीसुध्दा सक्रिय झाली आहे. प्रत्येकाने आपले उमेदवार उभे केले आहे. समदु:खी उमेदवारांची मनधरणी करताना राजकीय पक्षाची दमछाक होत आहे. भाजपने इच्छुकांना उमदेवारी नाकारल्याने अनेकांनी बंडखोरीकडे वाटचाल केल्याचे चित्र आहे. अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. परंतु आता उमेदवारी अर्ज कोण माघारी घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नगराध्यक्षपदाकरिता एकूण १५ महिला उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. १२ प्रभागांतील २४ नगरसेवक पदाकरिता १६४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. आता केवळ माघारीची वाट राजकीय पक्षांना लागली आहे. पालिकेत २४ सदस्य असून १२ प्रभाग आहेत. निवडणूक आयोगाने दोन सदस्यीय प्रभाग रचना केल्याने ६ प्रभागांचे १२ प्रभाग झाले आहेत. नगरसेवकांची संख्या २४ झाली. शहराची सन २०११ च्या जनगणनेनुसार ४५ हजार ४८२ एवढी लोकसंख्या असून मतदारांची एकूण संख्या ३४ हजार ६०७ आहे. यामध्ये पुरुष मतदार १७ हजार ८२४ तर स्त्री मतदार १६ हजार ५८३ आहे. नगरपरिषदेवर भाजपा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. वरुड विकास आघाडी विरोधात होती. वरुडचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला राखीव असल्याने नगराध्यक्षपदाकरिता १५ नामांकन दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, वरुड विकास आघाडीसह काही अपक्षांनी नामांकन दाखल केले, तर नगरसेवक पदाकरिता २४ जागांसाठी १६४ नामांकन दाखल झाले आहेत. उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर झाला आहे. यामुळे अंतर्गत बंडाळी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. यामध्ये भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तसेच विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे यांच्यासह अनेकांना पक्षश्रेष्ठीने उमेदवारी नाकारल्याने काहींनी अपक्ष उमदेवारी दाखल केली आहे. नवोदित उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रमुख पक्षामध्ये नगराध्यक्षपदासाठी राकाँतून माधुरी महेंद्र देशमुख, शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष जया नेरकर, हेमलता कुबडे, काँग्रेसकडून चित्रा सागर बेलसरे, भाजपाकडून स्वाती युवराज आंडे, वरुड विकास आघाडीकडून अस्मिता उमेश यावलकर, प्रहार संघटनेकडून प्रतिभा तिवारी, विदर्भ मुक्ती संघटनेकडून ताराबाई बारस्कर सह १५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काही पक्षामध्ये नगरसेवक पदाकरितासुध्दा उमेदवारीवरून अंतर्गत कलहाला मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. प्रमुख पक्षांनी नवोदीतांना संधी दिल्याने जुण्याजाणत्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही. नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. यावेळी एकापेक्षा एक उमदेवार निवडणूक रिंगणात राहिले तर निवडणुकीला चांगलाच रंग चढण्याची शक्यता आहे. एकमेकाविरुध्द कुरघोड्यांनासुध्दा वाव मिळणार आहे. अत्यल्प मताचा फटका पराभुतांना सहन करण्याची वेळ येऊ शकेल. भाजपचे आ. अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे नरेंशचंद्र ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, प्रहारचे आ.बच्चू कडू, वरुड विकास आघाडीचे उमेश यावलकर उमेदवारांच्या प्रचाराची रंगीत तालीम करून मतदारांचा आढावा घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)