शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर?

By admin | Updated: May 31, 2014 23:07 IST

जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या नगरनगराध्यक्ष पदाची निवडणूक जून महिन्यात होत आहे; मात्र या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत याविषयी लवकरच निर्णय

शासन अनुकूल : कॅबिनेटच्या बैठकीनंतर अधिसूचनेची शक्यताअमरावती : जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या नगरनगराध्यक्ष  पदाची निवडणूक जून महिन्यात होत आहे; मात्र या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत याविषयी लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार, चांदूररेल्ेवे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड व शेदुंरजना घाट येथील नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जून महिन्यात संभावित आहे. नगराध्यक्षपदाचे रोष्टर अद्यापपर्यंत निघाले नाही. मात्र प्रशासनाने या निवडणुकीची तयारी चालविली आहे. राज्यभरातील नगरपरिषदांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुक आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. अशातच लोकसभा निवडणुकीची आआचारसंहिता आणि शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू झाल्याने नगराध्यक्षांना कामे करणे कठीण झाले आहे. चार महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये गमविला गेल्याची बाब बहुतांश नगराध्यक्षांनी शासनाकडे विशद केली आहे. आचारसंहितेच्या काळात जी काही विकास कामे करता आली नाही ती कामे पूर्ण करता यावी यासाठी जूनमध्ये होणार्‍या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकांनंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या या मागणीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुकूल आहेत. हा विषय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केल्यानंतर यासंदर्भात अधिसूचना काढण्याची तयारीदेखील शासनाची असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका या लांबणीवर टाकण्याशिवाय गत्यंतर नाही, असा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर  आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत निर्णय होताच या विषयाची अधिसूचना त्वरेने काढली जाईल, असे संकेत आहे. हा निर्णय राज्यभरासाठी लागू होईल, वास्तव आहे. (प्रतिनिधी)