वातावरण तापले : सहकार क्षेत्रात रणधुमाळी सुरूअमरावती : सध्या सहकारी संस्थाच्या निवडणुका अंतिम टप्यात आहेत. त्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. त्यात आता जिल्ह्यातील ५ बाजार समितींची पंचवार्षिक निवडणूक १९ जुलै ते ३० आॅगस्ट दरम्यान होत असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी अचलपूर, चांदूररेल्वे, नांदगाव खंडश्वर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर या पाच बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २२ जून ते १ जुलैपासून विविध टप्प्यात कृषी उत्पन्न बाजार समिती करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीमुळे सहकारातही गटातटाचे राजकारण सुरू झाले असून सहकारातील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आतापासूनच प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी अचलपूर बाजार समितीसाठी २६ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर इतर बाजार समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडले.
पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST