शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

निवडणूक खर्च बाजार समित्यांच्याच माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:05 IST

सहकार विभागाच्या नव्या मसुद्याप्रमाणे बाजार समित्यांची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घेणार असले तरी निवडणुकांचा खर्च मात्र, बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे.

ठळक मुद्देमसुद्यात नमूद : डबघाईस आलेल्या समित्यांची स्थिती अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहकार विभागाच्या नव्या मसुद्याप्रमाणे बाजार समित्यांची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घेणार असले तरी निवडणुकांचा खर्च मात्र, बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे. आता निवडणुकांचा खर्च कित्येक पटीने वाढणार असल्याने डबघाईस आलेल्या बाजार समित्यांना आगामी निवडणुका अवघड जागेचे दुखणे ठरणार आहेत.सहकार विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत किमान १० आर जमीन धारणा असलेल्या शेतकºयांना मताधिकार दिलेला आहे. याची अधिसूचना काढली व आता निवडणुकीची नियमावली राजपत्रात जाहीर केली. यावर ३० नोव्हेंबरपर्यंत पणन संचालकाकडे आक्षेप मागविले आहेत. थेट जनतेमधून निवडून आलेले नगराध्यक्ष व सरपंचासाठी इतर पक्षाच्या तुलनेत सत्तापक्षाला अधिक कौल मिळाल्याने भाजपने सहकारातही चंचुप्रवेशासाठी अधिनियमात बदल केला. आता शेतकºयांना बाजार समित्यांमध्ये मताधिकार दिल्याने आगामी निवडणुकांत शेतकरी मतदारसंघ वाढणार आहे. त्यासाठीची क्लिष्ट प्रक्रिया जिल्हाधिकाºयांच्या देखरेखीत पार पडणार आहे.शासनाने शेतकºयांना मताधिकार दिल्याने प्रस्थापितांचा एकाधिकार मोडीत निघणार आहे. मतदार बदलामुळे निवडणुकांचा नवीन मसुदा आता राज्य शासनाने तयार केला आहे. त्यानुसार राज्य सहकारी प्राधिकरणाकडे बाजार समिती निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. शासनाच्या या बदलामुळे आता बाजार समिती निवडणुकांचा खर्च वाढणार आहे. तो खर्च बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे.उत्पन्नाचे साधन तोकडेजिल्ह्यात अमरावती, अचलपूर, दर्यापूर व धामणगाव वगळता उर्वरित बाजार समित्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. त्यामुळे निवडणुकीचा वाढीव खर्च करणे आता बाजार समित्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. यापूर्वी एक लाखाच्या निवडणूक खर्चाचीही तरतूद नसल्यामुळे तिवसा बाजार समितीची निवडणूक होऊ शकली नव्हती. परिणामी या ठिकाणी दोन वर्षे प्रशासकीय राजवट होती. आता हा खर्च पाच लाखांवर पोहोचणार आहे. त्या तुलनेत या बाजार समित्यांजवळ उत्पन्नाचे साधन तोकडे असल्यामुळे आगामी निवडणूक खर्चाचा डोलारा कसा सांभाळावा, असा या बाजार समित्यांसमोर उभा ठाकला आहे.-तर समिती सदस्य ठरणार अपात्रज्या व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरविले व या अपराधासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक मुदतीची शिक्षा न्यायालयाने दिली, तसेच वयाचे २१ वर्षे पूर्ण व्हायचे आहे ती विकल मनाची असल्याचे न्यायालयाने घोषित केले आहे. ती अमुक्त व नादान आहे. ती व्यक्ती बहिरी व मुकी आहे वा बाजार समितीची थकबाकीदार आहे. बाजार समिती किंवा शासनाची कर्मचारी आहे. त्या व्यक्तीचा किंवा भागिदारीत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बाजार समितीच्या रोजगारात वा हितसंबध आहे, त्यांनी अधिनियमाचा अधिक वेळा भंग केला वा विक्रेते, अडत्याला रकमा प्रदान करण्यास कसूर केल्या ती अपात्र ठरेल. आहे.