लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थायी समितीचे १६ पैकी आठ सदस्य निवृत्त होत असल्याने गुरुवारच्या आमसभेत रिक्त जागांवर सदस्यांची निवड करण्यात येत आहे. यामध्ये भाजपचे ३, काँग्रेसचे ३ व एमआयएमच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. समितीचे शेवटचे वर्ष असल्याने समावेशासाठी राजकीय पक्षांमधून चुरस वाढली आहे.स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार यांच्यासह भाजपच्या अनिता राज व सोनाली करेसिया, काँग्रेसचे प्रशांत डवरे, शेख जफर व अस्मा फिरोज खान तसेच एमआयएमचे मो. शाबीर मो. नशीर शेख महम्मद व रजिया खातून इक्रामोद्दीन हे सदस्य १ मार्चला स्थायी समितीमधून निवृत्त होत आहेत. त्यामुळे यात संधी मिळावी, यासाठी आता राजकीय पक्षांत चुरस वाढली आहे. बुधवारपर्यंत रिक्त जागांवर नावांची निश्चिती झालेली नव्हती. गुरुवारच्या आमसभेत गटनेत्यांद्वारे ही नावे दिल्यानंतर सभापती या नावांची घोषणा करणार आहेत.सद्यस्थितीत भाजपमध्ये अनिता राज यांची निवड पक्की मानली जाते. महापौर चेतन गावंडे यांनी राजीनामा दिल्यानंतरचा तीन महिन्यांचा कालावधी त्यांना मिळाला असल्याने या टर्ममध्ये त्यांना कायम ठेवणार असल्याची माहिती आहे. याशिवाय पंचफुला चव्हाण, सुनंदा खरडसह अजय गोंडाणे यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये सलीम बेग, नीलिमा काळे, बंडू हिवसे यांच्या नावांची चर्चा आहे. एमआयएममध्ये अद्यापही नावे निश्चित झाली नसल्याची माहिती आहे.अतिक्रमण, व्यापारी संकुल भाडेवाढ गाजणारफेब्रुवारी महिन्याच्या महासभेत व्यापारी संकुलांची भाडेवाढ या विषयावर सभागृह तापण्याची शक्यता आहे. भाडेवाढीसंदर्भात अध्यादेश महापालिकेला प्राप्त आहे. याशिवाय अतिक्रमण काढण्याची मोहीम गतिमान झाली असतांना राजकीय हस्तक्षेपाविषयी धोरणात्मक निर्र्णयाची अपेक्षा आहे. नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन पाळले गेले नाही. हा विषयदेखील गाजणार आहे.
‘स्थायी’च्या आठ सदस्यांची आज महासभेत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST
स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार यांच्यासह भाजपच्या अनिता राज व सोनाली करेसिया, काँग्रेसचे प्रशांत डवरे, शेख जफर व अस्मा फिरोज खान तसेच एमआयएमचे मो. शाबीर मो. नशीर शेख महम्मद व रजिया खातून इक्रामोद्दीन हे सदस्य १ मार्चला स्थायी समितीमधून निवृत्त होत आहेत. त्यामुळे यात संधी मिळावी, यासाठी आता राजकीय पक्षांत चुरस वाढली आहे.
‘स्थायी’च्या आठ सदस्यांची आज महासभेत निवड
ठळक मुद्देचुरस वाढली : भाजप ३, काँग्रेस ३, एमआयएमच्या २ सदस्यांचा समावेश