शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉप अप मॉडेल’ प्रभावीपणे राबवा, राज्याच्या प्रधान सचिवांचे निर्देश

By गणेश वासनिक | Updated: February 13, 2024 19:15 IST

राज्य शासनाच्या २८ जुलै २०२३ च्या निर्णयानुसार वनीकरण आणि मृद व जलसंधारण कामांसाठी टॉप अप मॉडेलला मंजुरी देण्यात आली आहे.

अमरावती : राज्यात वनीकरण, मृद व जलसंधारण कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांचे अभिसरण करून योजनेंतर्गत फरकाची रक्कम अदा करण्याचे प्रारूप (टॉप अप मॉडेल) प्रभावीपणे राबवा, असे निर्देश राज्याच्या महसूल व वने विभागाचे प्रधान सचिवांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या २८ जुलै २०२३ च्या निर्णयानुसार वनीकरण आणि मृद व जलसंधारण कामांसाठी टॉप अप मॉडेलला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अभिसरण योजनेला वनखात्यातून प्रचंड विरोध होत आहे. वनाधिकारी-कर्मचारी ही योजना राबविण्यास नकारघंटा देत आहे. तथापि, काहीही झाले तरी अभिसरण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे निर्देश प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेभुर्णीकर यांच्या नावे जारी केल्याने एकच तारांबळ उडाली आहे. मात्र, टॉप अप मॉडेल हे यंदापासून नव्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात वनविभाग, नियोजन विभाग (रोहयो यंत्रणा), ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग आदी विभागांचा सहभाग असणार आहे.अभिसरण योजनेसाठी या महत्त्वाचा मुद्द्यांवर आहे फोकस- टॉप अप मॉडेलमध्ये कामांचे ठराव घेणे-मजुरांचा समावेश करून ग्रामपंचायतींकडून मंजूर करणे- ग्रामपंचायतीची तातडीने ग्रामसभा घेणे.- मुख्य वनसंरक्षक / वनसंरक्षक यांनी कामांचा दररोज आढावा घेणे- पुरक लेबर बजेटमध्ये प्रस्तावित रोपवन कामे करणे- मोठी रोपे लागवडीसाठी वापरण्याची जबाबदारी वृत्त प्रमुखांवर असेल.- अभिसरण योजनेची धुरा सामाजिक वनीकरण विभागाकडे- दर आठवड्याला किमान दोन वेळा आढावा घेणे, क्षेत्रीय भेटी घेऊन मार्गदर्शन करणे.- या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयारकरून ऑनलाइनप्रणाली विकसित करणे.- विहित कालमर्यादेत प्रभावी अंमलबजावणीसाठी एसओपी तयार करणे.वन बल प्रमुखांचा अहवालाकडे दुर्लक्षअभिसरण योजनेच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीकडून प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी प्रधान सचिव रेड्डी यांना सुयोग्य असा अहवाल सादर केला आहे. चालू आर्थिक वर्षातील कालावधी लक्षात घेता योजनेंतर्गत प्राप्त अनुदान ‘टॉप अप मॉडेल’नुसार खर्ची घालणे घाईचे होईल, असे कळविले आहे. तरीही वन बलप्रमुखांचा अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती