शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गावर प्रभावी लस तयार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:00 IST

कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरुद्ध लस तयार करण्यासाठी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मुमताज बेग यांनी मोलाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय जर्नल ‘ट्रान्सबाऊंडरी इमर्जिंग डीसीसेज’मध्ये त्यांचे संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देमुमताज बेग यांचा संशोधन पेपर प्रसिद्ध भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचा पुढाकार

गणेश वासनिक/लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘कॅनाइन डिस्टेंपर वायरस’ डीएनए हा सिक्वेंसिंगशी संबंधित आहे. हा विषाणू पाळीव कुत्र्यांमध्ये आढळतो. बरेचदा हा विषाणू वनक्षेत्रातील सिंह, वाघ, बिबट यांच्यात संक्रमित होतो. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या गीर मधील पाच सिंहाचा मृत्यू याच विषाणूमुळे झाले. त्यामुळे कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरुद्ध लस तयार करण्यासाठी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मुमताज बेग यांनी मोलाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय जर्नल ‘ट्रान्सबाऊंडरी इमर्जिंग डीसीसेज’मध्ये त्यांचे संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहे.प्रा. बेग यांनी या समस्येवर मात करण्यासाठी संशोधनात पाळीव कुत्र्यांमधून ‘कॅनाइन डिस्टेंपर वायरस’चे नमुने गोळा केले आणि अत्यंत अधिकृत भारतीय पशुवैद्यकीय संशोधन प्राणीशाळेत त्यांचे डीएनए तपासले गेले. प्रा. बेग यांनी या संशोधनात डीएनए अभ्यास विश्र्लेषक म्हणून काम पाहिले. या संशोधनात भारतातील कुत्र्यांमध्ये प्रसारित होणारा विषाणू युरोप, पूर्व आशिया या सारख्या जगाच्या इतर भागांत आढळणाऱ्या विषाणूपेक्षा खूप वेगळा आहे. यापूर्वी या विषाणुमुळे सेरेन्गेही जंगल पूर्व आफ्रिका येथील ३० टक्के आफ्रिकी सिंहाचे मृत्यू झाले आहेत. भारतात ‘कॅनाइन डिस्टेंपर वायरस’ प्रतिबंधकरिता भरपूर लसेस उपलब्ध आहेत. परंतु, अलीकडे या लसेस अकार्यक्षम ठरत आहेत. तथापि, प्रा. बेग यांचे महत्त्वपूर्ण संशोधन पेपर बरेली, गुवाहाटी आणि हैद्राबाद येथील भारतीय पशुवैद्यकीय संस्थानच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तराच्या संस्थेने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे येत्या काळात कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरु द्ध प्रभावी लस तयार होणार आहे.कुत्र्यांमधील त्या विषाणूवर प्रतिबंधात्मक लसेस तयार केल्या आहेत. मात्र, त्या फारशा प्रभावी ठरल्या नाहीत. त्यामुळे कुत्र्यांना लस दिल्यानंतरही संसर्गजन्य विषाणू कायम राहतो. आता पहिल्या टप्प्यात डीएएनवर अभ्यास आणि दुसºया टप्प्यात प्रभावी लस तयार केली जाईल.- मुमताज बेग,प्राध्यापक, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती

टॅग्स :dogकुत्रा