शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
4
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
5
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
6
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
9
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
10
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
11
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
12
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
13
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
14
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
15
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
16
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
17
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
18
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
19
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
20
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

आर्थिक घोटाळ्यांना गणेश अणे यांचे बळ !

By admin | Updated: December 29, 2014 00:49 IST

पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत निरीक्षकपदी कार्यरत असलेले गणेश अणे यांनी श्री सुर्या, वासनकर ग्रुप आणि राणा लँडमार्क असल्या फसवणूककर्त्यांना बळ दिले.

अमरावती : पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत निरीक्षकपदी कार्यरत असलेले गणेश अणे यांनी श्री सुर्या, वासनकर ग्रुप आणि राणा लँडमार्क असल्या फसवणूककर्त्यांना बळ दिले. त्यापोटी बक्कळ कमाई केली. सामान्य जनतेची त्यामुळे लूट होत राहिली, अशी तक्रार युवा सेनेने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली. अणे यांच्या कारभारावर प्रकाश टाकणाऱ्या तीन पानांच्या लांबलचक तक्रारीअंती त्यांच्या खातेनिहाय आणि चलअचल संपत्तीची चौकशी तसेच आर्थिक गुन्हे शाखेतून तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्याच एका शाखेने ही गंभीर तक्रार केल्यामुळे मुद्दा चर्चेचा ठरला आहे. अणे यांना शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चौथे वर्ष सुरू आहे. नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत ठाणेदार असताना त्यांनी 'सोफिया'च्या अतिभारीत ट्रकना राजरोस वाहतूक खुली केली होती. नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या कारकिर्दीतच त्यांनी 'बिझीलँड'शी संबंधित एका प्रकरणात आर्थिक घोळ केला होता. त्यामुळेच तत्कालिन पोलीस आयुक्तांनी त्यांचे स्थानांतरण 'कंट्रोल रूम'ला केले होते. त्यानंतर अणे यांनी स्वत:हून शासनाला बदली मागितली होती. त्यानुसार एटीएसला त्यांची बदलीदेखील झाली होती. पुढे या बदलीला स्थगिती देण्यात आली. अणे यांची थेट आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. अणे यांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यकाळात श्री सुर्या ग्रुप, वासनकर समूह, राणा लँडमार्क यासारखे अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात अणे यांनी निष्पक्ष चौकशी न करता घोटाळेबाजांची, आरोपींची पाठराखण केली. सामान्यांचा पैसा लुटणाऱ्या गुन्हेगारांना अभय दिले. चंद्रशेखर राणा हा फसवणूक प्रकरणातील एक आरोपी वर्ष उलटूनही फरार आहे. आर्थिक प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार देण्यास गेलेल्यांना अणे हे तक्रार न देण्यासाठी प्रवृत्त करतात. गैरअर्जदारांना फोन करून प्रेमळ भाषेतून तक्रार न देण्याविषयी मन वळवितात. २३ डिसेंबर रोजीचा विद्यार्थ्यांचा एका प्रकरणातील याविषयीचा अनुभव ताजा आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अणे हे असल्याने फसवणूक करणाऱ्यांचे मनसुबे बळावले आहेत. त्यांची त्या पदावरून तातडीने बदली करण्यात यावी. आम्ही केलेल्या सर्व गंभीर आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेने गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बऱ्याच प्रकरणांत वादग्रस्त ठरलेल्या अणे यांच्यासंबंधाने गृहखाते काय निर्णय घेते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)