शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक नादारीत १९ कोटींचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:15 IST

उत्पन्नाच्या मर्यादित स्त्रोताने आर्थिक नादारीत ढकलल्या गेलेल्या अमरावती महापालिकेला राज्य शासनाने आनंदवार्ता दिली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेला दिलासा : जीएसटीच्या अनुदानात ११ कोटींनी वाढ

आॅनलाईन लोकमतअमरावती : उत्पन्नाच्या मर्यादित स्त्रोताने आर्थिक नादारीत ढकलल्या गेलेल्या अमरावती महापालिकेला राज्य शासनाने आनंदवार्ता दिली आहे. जीएसटीच्या अनुदानात तब्बल ११ कोटींची वाढ करीत अमरावतीच्या वाट्याला १८.९३ कोटी रुपये आल्याने प्रशासन हर्षभरित झाले आहे. जुलै २०१७ पासून महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी महिन्याकाठी केवळ ७.८३ कोटी रुपये मिळत होते. त्यातून महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च भागविला जात होता. जीएसटी अनुदानाची रक्कम वाढून मिळावी, यासाठी आयुक्त हेमंत पवार यांनी नगरविकास विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.मार्चमध्ये जीएसटीच्या भरपाईपोटी मिळालेले १८.९३ कोटी रुपये त्यांच्या प्रयत्नांचा परिपाक ठरला.वर्षभरात महापालिकेची आर्थिक परिस्थिती कधी नव्हे ती पार रसातळाला गेली आहे. त्यातच बांधकाम परवानगी शुल्क व मालमत्ता कराच्या वसुलीतून येणाºया उत्पन्नालाही मर्यादा आल्याने प्रशासन घायकुतीस आले आहे. जकात आणि एलबीटी प्रणाली सुरू असताना महापालिकेची गाडी बºयापैकी रुळावर होती. मात्र, १ जुल्ैपासून एलबीटी बंद झाल्यानंतर महाराष्टÑ वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीलागू करण्यात आला. त्या भरपाईपोटी राज्यातील सर्व महापालिकांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न चुकता ते अनुदान देण्यात आले. मात्र जकात आणि एलबीटीच्या तुलनेत ते अनुदान अत्यंत कमी असल्याने त्यात वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव अमरावती महापालिकेसह अन्य महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे दिले होते. मात्र अमरावती महापालिकेलाच ७.८३ ऐवजी १८.९३ कोटी रुपयांचे वाढीव अनुदान मिळाले. नगरविकास विभागाने राज्यातील १८ महापालिकांना मार्च महिन्यासाठी २९०.४७ कोटी रुपये जीएसटी भरपाई अनुदान दिले. त्यात अमरावतीच्या वाट्याला आलेल्या १८.९३ कोटी रुपयांचा समावेश आहे.चिंता मिटली२०. ८० कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणने अमरावती शहराचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी टप्प्या -टप्प्याने ५ कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यातील १ कोटी रुपये या आठवड्यात महावितरणला द्यावयाचे होते. त्या रकमेची तजविज जीएसटी अनुदानातून करण्यात येईल. याशिवाय बांधकाम कंत्राटदारांनाही ८ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग १८.९३ कोटी रुपये प्राप्त झाल्याने प्रशस्त झाला आहे.