शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांपुढील कामासाठी ई-टेंडर

By admin | Updated: August 4, 2015 00:02 IST

शासकीय संस्था, स्वायत्त संस्थांना लागणाऱ्या वस्तुंची खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासन निर्णय : १ आॅक्टोबरपासून अंमलबजावणीअमरावती : शासकीय संस्था, स्वायत्त संस्थांना लागणाऱ्या वस्तुंची खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तीन लाखांपेक्षा अधिक खरेदी असल्यास यापुढे ई-टेंडरिंगच करावे लागेल. या धोरणाची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २०१५ पासून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या २३ वर्षांत खरेदीच्या धोरणामध्ये बदल झाला नव्हता. खरेदी प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी तीन लाखांवरील सर्व खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा निर्णय ३० जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या धोरणात राज्यभरातील उद्योजकांना तसेच सूक्ष्म व लघु उद्योजकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यातही अनुसूचित जाती व जमातीतील लघु उद्योजकांना विशेष प्राधान्य असेल. नव्या धोरणानुसार मध्यवर्ती भांडार खरेदी संस्थेमार्फत करण्यात येणारे दर करार बंद करण्यात आले आहेत. बहुतांश खरेदी जिल्हा व विभागस्तरावर त्यांच्या वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत राहील. यामध्ये उद्योजकांना प्राधान्य देऊन राज्याबाहेरील पुरवठादारांचा कर कमी असेल तर पुरवठादारांना ५० टक्के कंत्राट देण्याचा अधिकार असेल. सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी २४१ वस्तू राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ही खरेदी करताना त्यातील २० टक्के खरेदी ही अनुसूचित जाती व जमातीतील उद्योजकांकडून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यापूर्वी विविध कामांसाठी पाच लाखांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी व इतर बाबींसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविली जात होती. मात्र, आता तीन लाखांवर खरेदी करताना ही प्रक्रिया केली जाईल. यामुळे कामात पारदर्शकता येईल. - रवींद्र मुंदे,सदस्य, जिल्हा परिषद.