शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

ई-वन वाघीण, मृत शोभाराम आणि राजकारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला .

ठळक मुद्देदोन महिन्यांची दहशत संपुष्टात : आदिवासींनी घेतला मोकळा श्वास

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील राजकीय वातावरण सध्या इ-वन वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शोभाराम चव्हाण यांच्या मृत्यूने चांगलेच तापले आहे. मृताच्या परिजनांना राजकारण्यांनी काय दिले, हे गेल्या तीन दिवसांत कळेनासे झाले आहे. तरीसुद्धा जे काही करण्यात आले, ते केवळ आमच्या म्हणण्यानुसार झाले, याचे श्रेय घेण्यावरून राजकीय पुढाऱ्यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दादरा येथील शोभाराम कालुसिंग चव्हाण हा ३० आॅगस्टच्या रात्री सवंगड्यांसह शेतातील कामे आटोपून रात्री ८ वाजता आपल्या घराकडे निघाला होता. मात्र, ही रात्र त्याच्यासाठी शेवटची रात्र ठरणार, याची कल्पनाही त्याला नव्हती. काही अंतरावर असलेले गाव डोळ्यांसमोर दिसत असतानाच रस्त्याच्या बाजूने ई-वन वाघिणीने शोभारामवर हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दिलीप सरदार चव्हाण यालासुद्धा वाघिणीने गंभीर जखमी केले. मानव आणि प्राणी यांच्या या युद्धात शोभारामला जीव गमवावा लागला आणि दिलीप चव्हाण हा अमरावती येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला . ही वाघीण मेळघाटातील जंगलातून बाहेर निघावी, यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी शासनाला सात दिवसाची अल्टिमेटम देताच प्रशासन जागे झाले. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता. वनविभागाला अशा घटनेची प्रतीक्षाच होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शोभाराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार केवलराम काळे आणि राजकुमार पटेल यांच्यासह युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांनी मृताच्या कुटुंबाला भेट देऊन जणू आपणच त्यांचे खरे पालक आहोत, या तºहेने ते प्रसिद्धी माध्यमांसमोर आले.राजकारणाला रंगतअवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण किती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहोत, हे दाखविण्यासाठी वाघिणीच्या प्रकरणात आपले अस्तित्व सर्व राजकीय नेत्यांनी आपापल्या परीने दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खºया अर्थाने मेळघाटातील राजकारणाला रंगत चढली.उशिराचे शहाणपणई-वन वाघीण, मृत शोभाराम आणि राजकारण याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा गाजत आहे. या प्रकरणात आपणच सर्वात मोठी भूमिका बजावली, याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मानवाचा जीव राजकारणापेक्षा मोठा नाही, हे कधी उमगेल ?

टॅग्स :Tigerवाघ