शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

अमरावतीत लवकरच ई-बस ; चार्जिंग स्टेशनसाठी १० कोटींची निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:07 IST

Amravati : कोडेंश्वर मार्गालगतच्या महसूल जागेवर सुसज्ज इमारत साकारणार, पाच निविदा प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेट्रो शहराच्या धर्तीवर अमरावतीकरांनासुद्धा लवकरच पीएम ई-बस सुविधा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निधीतून कोंडेश्वर मार्गालगत सुसज्ज इमारतीसह चार्जिंग स्टेशन साकारले जाणार आहे. त्याअनुषंगाने इमारत बांधकामासाठी महानगरपालिका प्रशासनाने ई-निविदा प्रक्रिया राबविली असून, पाच निविदाधारक स्पर्धेत आहेत. अद्यापपर्यंत शहर अभियंत्यांनी निविदा उघडल्या नाहीत, अशी माहिती आहे.

केंद्र शासनाने अमरावती महानगरपालिकेला नऊ मीटर लांबीच्या ४० ई-बसेस मंजूर केलेल्या आहेत. सात मीटर लांबीच्या १० बसेसला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. बडनेरा लगतच्या कोंडेश्वर मार्गावरील ई-क्लास जमिनीवर १० कोटींच्या निधीतून ई-बससाठी सुसज्ज इमारत साकारली जाणार आहे. येत्या काळात ६ कोटी ७३ लाखांच्या निधीतून चार्जिंग स्टेशन, वीज सबस्टेशन आदी बाबींचा समावेश असून, ही कामे एमएसईडीएल, महानगरपालिका प्रकाश विभागाच्या नियंत्रणात होणार आहे. ई-बसेससाठी राज्य शासनाने महसूलच्या जागेला मान्यता प्रदान केली आहे. 

जागतिक स्तरावर वाढते प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवर होणारा शासनाचा खर्च वाचविण्यासाठी 'ई-व्हेईकल' हा सर्वात चांगला पर्याय आहे. त्यामुळे अमरावती शहरातील अंतर्गत दळणवळणासाठी ई-बस सेवेची प्रतीक्षा नागरिकांनाही लागली आहे.

आता नागपूरनंतर अमरावतीत ई-बस सेवाकेंद्र शासनाने 'मेट्रोपॉलिटिन' शहरात ई-बस सेवा अनिवार्य केली. नागपूर शहरात ती सुरू झाली आहे. आता अमरावतीत चार्जिंग केंद्राच्या जागेचा तिढा सुटला आहे. शासकीय जागेसंदर्भातील फाइल महसूल मंत्रालयाने मंजूर केली आहे. आता काही दिवसातच ई-बससाठी प्रत्यक्षात इमारत बांधकामाला प्रारंभ होणार असून, किमान या वर्षात तरी ई-बससेवा सुरू होईल, अशी अपेक्षा अमरावतीकरांना आहे.

"ई-बस सुविधेसाठी पाच निविदा प्राप्त झाल्या. इमारत बांधकाम व उर्वरित कामेसुद्धा आता वेगाने होतील. रस्ता सुरक्षा प्राधिकरणाने नव्याने ३५ मार्गांना मान्यता दिली."- लक्ष्मण पावडे, उपअभियंता, वाहन कार्यशाळा, महानगरपालिका

टॅग्स :Amravatiअमरावती