शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

 तपोवन वर्कशॉपमध्ये होणार ई-बस चार्जिंग; बडनेरासह ७ आगारात प्रस्ताव, चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन

By जितेंद्र दखने | Updated: November 30, 2023 19:25 IST

अमरावती मध्यवर्ती बसस्टँड व डेपोमध्ये जागा नसल्याने तपोवन येथील वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

अमरावती: अमरावती मध्यवर्ती बसस्टँड व डेपोमध्ये जागा नसल्याने तपोवन येथील वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. आधी बडनेरा स्थानकावर जागा नसल्याने राजापेठ येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ठरले होते. परंतु, आता बडनेरा स्थानकाजवळ जागा मिळाल्यामुळे तेथेच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यासह अचलपूर, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, दयार्पूर या ठिकाणीही चार्जिंग स्टेशन उभारण्यास एसटी महामंडळाने अनुमती दिली आहे. याशिवाय चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाकडे स्थानिक विभागीय नियंत्रक कार्यालयाने सादर केला आहे.

अमरावती विभागासाठी एसटी महामंडळाकडे १७३ इलेक्ट्रिक बसची मागणी केली आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. तत्पूर्वी, चार्जिंग स्टेशन उभारावे लागतील. याकरिता विभाग नियंत्रक कार्यालयाने ७ ठिकाणी इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्हाभरात एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तसेच महावितरणकडून परवानगी व उच्च दाबाची विद्युत वाहिनी घ्यावी लागणार आहे. ज्या डिझेल एसटी बसची मुदत संपली त्यांच्या जागी इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बससह डिझेल बसही विभागात धावतील. अमरावती विभागात आधीपासूनच तंत्रज्ञ आहेत. ते इलेक्ट्रिक बसचा रखरखाव तसेच दुरुस्तीसाठी कामी येतील. कारण बसची यंत्रे ही सारखीच असून, केवळ या बस विजेवर धावतील. त्यामुळे आधीचेच तंत्रज्ञ या कामी वापरता येतील, अशी माहिती अमरावती विभागीय नियंत्रकांनी दिली. निविदा प्रक्रियेला गतीअमरावती एसटी विभागातील आठपैकी सात डेपोमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन प्रस्तावित आहे. -नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ अमरावती 

टॅग्स :Amravatiअमरावती