शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींचे निराकरण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:44 IST

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही.

ठळक मुद्देमकरंद रानडे : अतिसंवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही. पोलिसांची प्रतिमा मलीन होणार नाही, असे मत नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.आयजी मकरंद रानडे यांनी एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील आंध्रा बँकेत कर्तव्य बजावले. पिंपरी चिचवड येथे दहा महिने अपर पोलीस आयुक्तपद भूषविले. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील १० प्रमुख युनिटची धुरा सांभाळली होती. नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरनंतर पुणे व पिंपरी चिचवड येथील पोलीस विभागात कर्तव्य बजावले.मकरंद रानडे हे १९८८ मध्ये डीवायएसपी पदावर रुजू झाले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना २००२ मध्ये आयपीएसचा दर्जा प्राप्त झाला. नाशिक येथील कुंभमेळ्यातील सुरक्षेची जबाबदारी रानडे यांनी पार पाडली. तेथील सुरक्षेविषयी रानडे यांना दोन वेळा बोलाविण्यात आले होते. २००४ मध्ये रानडे यांना राष्ट्रपती पदकाने भूषविण्यात आले. त्यांना पोलीस महासंचालक आणि भारत सरकारचे बोधचिन्ह मिळाले. पुणे येथील पिंपरी चिंचवड येथून पदोन्नत बदली होऊन मकरंद वानखडे यांनी नुकताच अमरावती परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक पदभार स्वीकारला.अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन, विविध पोलीस ठाण्यांना व अधिकाऱ्यांना भेटी देऊन, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रयत्न मकरंद रानडे हे करणार आहेत. प्रलंबित प्रकरणांकडे विशेष लक्ष देऊन, ती निकाली काढण्यास प्राधान्य राहणार आहे.नागरिक न्यायाच्या अपेक्षेने पोलिसांकडे येतात. त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक देणे, त्यांची समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे, याबाबत दखल घेऊ. नागरिकांचे समाधान करण्याकडे लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय दिल्यास ते समाधानी होतात. त्यावेळी पोलिसांची प्रतिमा उंचावते, असे मत स्पेशल आयजी मकरंद रानडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन संवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस