शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धूळघाट रोहयो अपहाराची 'तारांकित' माहिती दडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:02 IST

धूळघाट रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता.

ठळक मुद्देविधिमंडळाची दिशाभूल : रोहयो उपायुक्त कार्यालयाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धूळघाट रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. परंतु, विभागीय आयुक्तांच्या रोहयो उपायुक्त कार्यालयाने याची माहिती न पाठविता ती दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे रोहयो अपहाराची पायमुळे किती खोलवर रूजलीत, हे स्पष्ट होते.धुळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रातील ग्राम पळसकुंडी येथे रोहयो कामात अनियमितता झाल्याप्रकरणी सहा महिन्यांच्या चौकशीनंतर नऊ जणांवर धारणी पोलिसात गुन्हे दाखल झाले. मात्र, हे प्रकरण पोलिसांत जाण्यापूर्वी आ. भिलावेकर यांनी तारांकित प्रश्न क्रमांक ११८५६ अन्वये विधिमंडळात पोहचविले. त्यानुसार महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत भिसे यांनी १९ मार्च २०१८ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व धारणी तहसीलदारांच्या नावे पत्र पाठवून धूळघाट रेल्वेच्या वन परिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण, वनरक्षक सविता बेठेकर यांनी रोहयोच्या कामात अनियमितता केल्याची माहिती पाठविण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी शासनाने चौकशी केली अथवा नाही, रोहयो अपहारातील दोषींवर गुन्हे दाखल होण्यास विलंब का? अशा प्रश्नान्वये माहिती वजा उत्तर पाठविणे अनिवार्य होते. परंतु, रोहयो कामांत अपहाराची चर्चा विधिमंडळात झाल्यास अमरावतीची लक्तरे वेशीवर टांगली जातील, या भीतीपोटी हा तारांकित प्रश्न ‘मॅनेज’ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विधिमंडळात तारांकित मॅनेज करण्यापर्यंत प्रयत्न करू शकतात, तर पोलिसांना ‘मॅनेज’ करणे ही बाब दोषींसाठी क्षुल्लक आहे. त्यामुळे धारणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनात ताब्यात घेण्यात आलेल्या नऊ आरोपींना सन्मानाने सोडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४६७, ४७१, ४७७ अन्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते.भिलावेकर 'नॉट रिचेबल'धूळघाट रेल्वेच्या आरएफओ व वनरक्षकाने रोहयो कामात अपहार केल्याप्रकरणी आ. प्रभुदास भिलावेकर यांनी तारांकित प्रश्न विधिमंडळात दाखल केल्यानंतर माहिती मिळाली काय याची विचारणा केली असता, ते 'नाट रिचेबल' आढळून आले.आरोपींचे मेडिकल झाल्यानंतर सोडले?धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत ग्राम पळसकुंडी येथे रोहयो कामात अनियमितता झाल्याप्रकरणी नऊ आरोपींना २६ एप्रिल रोजी चौकशीासाठी ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींचे मेडिकल करण्यात आले. मात्र, त्यानंतर महसूल व वनविभागाच्या वरिष्ठांनी सूत्रे हलविताच ताब्यात घेतलेल्या नऊ आरोपींना समज देऊन सोडूण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना सोडून देण्याची घटना ही जिल्ह्यात बहुधा पहिली असावी.रोहयो उपायुक्तांचा प्रतिसाद नाहीआ. प्रभूदास भिलावेकर यांनी विधिमंडळात सादर केलेल्या तारांकित प्रश्नाबाबत १९ मार्च २०१८ रोजी शासनाकडे माहिती पाठविण्यात आली नाही. याबाबत विभागीय आयुक्तांच्या रोहयो कार्यालयाचे उपायुक्त शहाजी पवार यांच्याशी ‘लोकमत’ने वारंवार संपर्क साधूनदेखील त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही, हे विशेष. रोहयो कार्यालयात अनियमिततेने कळस गाठला असून, यातील वास्तव लवकरच समोर येण्याचे संकेत आहे.