शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

‘वर्ल्डक्लास’ इमारतीच्या नावावर धूळफेक

By admin | Updated: August 8, 2016 23:56 IST

स्थानिक कॅम्प रोडवरील डागा सफायर या निर्माणाधीन इमारतीच्या कर्त्याधर्त्यांनी ग्राहकांची फसवणूक चालविली आहे.

‘डागा सफायर’ अनधिकृतच : ग्राहकांमध्ये कमालीची धास्ती अमरावती : स्थानिक कॅम्प रोडवरील डागा सफायर या निर्माणाधीन इमारतीच्या कर्त्याधर्त्यांनी ग्राहकांची फसवणूक चालविली आहे. तत्कालीन आयुक्तांनी आपल्याला आठ मजली इमारत उभारण्यास मंजुरी दिल्याचा दावा डागा सफायरकडून करण्यात येत असला तरी त्यांनी वर्ल्डक्लास इमारतीच्या नावावर धूळफेक चालविल्याचे आता स्पष्ट झाले आहे.अंबानगरीवासियांसाठी आपण वर्ल्डक्लास इमारती उभारत असल्याचा दावा डागा सफायरकडून वारंवार करण्यात येतो. या आठ मजली इमारतींमध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन ग्राहकांना इतरांपेक्षा अधिक सुविधायुक्त फ्लॅट देण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. मात्र, हायराईज बिल्डिंग बांधण्याचा दावा करणाऱ्या डागा सफायरची पायाभरणीच खोट्यावर आधारित असेल तर उर्वरित सारेच अनधिकृत आणि अवैध ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांमधून उमटली आहे.लाखो रूपये खर्च करुन डागा सफायरमध्ये फ्लॅट बुक करणाऱ्यांमध्येही अवैध बांधकामामुळे खळबळ उडाली आहे. या तीनही टोलेजंग इमारती अवैध असतील तर फ्लॅटची मालकी घेतल्यानंतरही महापालिका वा कोर्टबाजीला सामोरे जावे लागेल, या भीतीने अनेकांची पाचावर धारण बसली आहे.महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ अंतर्गत बांधकाम परवानगीचा अर्ज नकाशासह रितसर आॅटो डीसीआर प्रणालीअंतर्गत या कार्यालयात दाखल करावा.नोटीस बजावलीअमरावती : तत्पूर्वी १० लाखांची अनामत रक्कम २ दिवसांत भरावी, अशी नोटीस १९ मे रोजी सहायक संचालक नगररचना विभागाकडून डागा इन्फ्राटेक प्रा.लि.च्या ध्रुव डागा यांना पाठविली. यानुसार डागा सफायरला बांधकाम परवानगीचा अर्ज नकाशासह आॅटो डीसीआर प्रणालीअंतर्गत दाखल करावयाचा होता. मात्र,त्यांनी तसा अर्ज एडीटीपीकडे दाखल केला नाही. त्यामुळे डागा सफायरच्या ए,बी आणि सी या तीन इमारतींमधील ३४९६.३२ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत आणि अवैध ठरविण्यात आले. याप्रकरणी राजेश डागा यांना महापालिकेकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. डागा यांना १५ दिवसांमध्ये बाजू मांडायची असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.ए,बी आणि सी या तीन इमारतींमध्ये डागा यांनी तब्बल ३४९६.३२ चौरसमीटर अनधिकृत बांधकाम केले आहे. (प्रतिनिधी)