शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील 'त्या' संगणकांवर धुळीचे थर

By admin | Updated: February 16, 2016 00:21 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ...

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : भारनियमन, पुरेशा जागेचा अभावअमरावती : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळांना संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र विद्युत भारनियमन, संगणक परिचालक पुरेशा जागेचा अभाव यामुळे तर काही ठिकाणी विद्युत देयके, संगणक दुरुस्तीसाठी वेगळा निधी मिळत नसल्यामुळे बऱ्याच शाळांमधील संगणक धूळ खात आहेत. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित आहेत. शासनाने उच्च प्राथमिक शाळांमध्ये २००६ - २००७ पासून संगणक उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नियमसंगत असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत दहा संगणक संच मिळाले आहेत. फक्त सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळाले. त्यानंतर संगणकात झालेला बिघाड व दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकाकडे नसलेल्या निधीची तरतूद, विद्युत देयके भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धूळ खात पडले आहेत. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शासनाच्या या योजनेलाही फटका बसत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संबंधितांनी आवर्जून लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनामार्फत संगणकावर लाखो रुपये खर्च करण्यात येते. परंतु ग्रामीण भागामधील शाळांमधून संगणकाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)