शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

दारूविरोधात महिलांचा दुर्गावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:09 IST

सहा महिन्यांपासून बंद असलेले स्थानिक जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सुरू होताच शुक्रवारी परिसरातील तब्बल ५०० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत यादुकानावर धडक दिली.

ठळक मुद्देदुकानावर धडक : बाटल्यांची फेकफाक, स्थानांतरण हवेच

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : सहा महिन्यांपासून बंद असलेले स्थानिक जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सुरू होताच शुक्रवारी परिसरातील तब्बल ५०० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत यादुकानावर धडक दिली. दुकान स्थानांतरित करण्याची मागणी पुन्हा एकदा महिलांनी रेटून धरली. रणरागिणींनी दुकानात विक्रीसाठी आणलेल्या देशी दारूच्या बाटल्यांची फेकफाक केली आणि या दुकानाला महिलांनीच कुलूपही ठोकले.जुन्या वस्तीतील उपरोेक्त मद्यविक्रीचे दुकान हे शाळा, मंदिर, व रहिवासी वस्तीच्या अगदी मध्यभागी आहे. त्यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते, असा महिलांचा मुद्दा आहे. सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोठ्या संख्येने मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी शासनाच्या मध्यस्थीने बरीच दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. भगतसिंग चौकातील हे देशीदारू विक्रीचे दुकान देखील बंद होते. पूर्वीपासून या दुकानाला परिसरातील नागरिकांचा विशेषत: महिलांचा व सामाजिक संघटनांचा विरोध आहे. अनेकदा प्रशासनाकडे दुकानाच्या स्थानांतरणाची मागणी करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर, शुक्रवार रोजी हे दुकान सकाळी ११ वाजता सुरू झाले. दुकानात दारूचे बॉक्स आणण्यात आले. मात्र, लगोलग परिसरातील तब्बल ५०० च्या जवळपास महिलां व पुरूषांनी दुकानावर धडक दिली. बाटल्या, दारूचे बॉक्स फेकून व नारेबाजी करीत निषेध नोंदविला. पंधरवड्यापूर्वीच जिल्हाधिकाºयांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. दुकानाच्या स्थानांतरणाचीी मागणी तक्रारकर्त्यांनी केली होती. दुकानाच्या स्थानांतरणासाठी मतदान घेण्याची तयारी देखिल महिलांनी दर्शविली होती. नगरसेविका गंगा आंभोरे, छाया अंबाडकर, अलका अंबाडकर, सिंधू मतलाने, सुशीला गव्हाळे, लीला चिरडे, शोभा आजनकर, सविता ईखार, शालिनी टारपे, प्रीया भगत, सीमा हिवराळे, सुमन सुने, सुभद्रा मोडक, दुर्गा भैसने, नीता बांडाबुचे, सुनंदा दारोकार आदी महीला व पुरूष उपस्थित होते. बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.