शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन विभाग वाऱ्यावर, प्रभारींच्या भरवशावर डोलारा, आग न लागलेलीच बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

रात्री 12 नंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट. लोगो- रिॲलिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय@1:00am अनिल कडू परतवाडा : मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन ...

रात्री 12 नंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट.

लोगो- रिॲलिटी चेक

अग्निशमन विभाग कार्यालय@1:00am

अनिल कडू

परतवाडा : मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन विभाग वाऱ्यावर असून प्रभारीवर डोलारा उभा आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा आहे. लीडिंग फायरमन आणि चालकांची पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण घेतलेले मदतनीस अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नाहीत. या मनुष्यबळाअभावी अचलपूर नगर परिषदेची फायर ब्रिगेड काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील केमिकल फॅक्टरीला लागलेली आग आटोक्यात आणण्याकरिता पोहोचू शकली नव्हती.

जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची संख्या बघता अचलपूर, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर नगर परिषदांकडेच अग्निशमन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. या तिघांकडे उरलेल्या नगर परिषद व नगरपंचायतींचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे या अतिरिक्त प्रभारामुळे त्या-त्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या अग्निशमन विभागाचे कार्य प्रभावित झाले आहे. ज्या ‘अ’ वर्ग नगर परिषदांची लोकसंख्या एक ते दोन लाख आहे, अशा ठिकाणी अग्निशमन अधिकाऱ्याचे पद मान्य आहे. पण, जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगर परिषद असलेल्या अचलपूरलाही अग्निशमन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे.

लोकमत रियालिटी चेक अंतर्गत १२ सप्टेंबरला रात्री १२ नंतर अचलपूर नगर परिषदेतील अग्निशमन दलाला भेट दिली असता, हे कार्यालय अलर्ट होते. या ठिकाणी प्रभारी चालक राधेश्याम शर्मा आणि त्यांचे मदतनीस दीपक गणेशे व अशोक नघाटे कर्तव्यावर हजर होते. पण, एकही फायरमन कर्तव्यावर नव्हता.

तयार स्थितीत तीन बंब

अचलपूर नगर परिषदेच्या फायर स्टेशन मध्ये फायर ब्रिगेडचे तीन बंब तयार होते. सोबतीला एक जुनी फायर ब्रिगेडची गाडीही पाणी घेऊन उभी होती. पण, चालक मात्र एकच, तेही प्रभारी कर्तव्यावर हजर होते.

चालक अलर्ट:--

अचलपूर नगर परिषदेच्या फायर स्टेशनमध्ये तीन बंब तयार असले तरी केवळ एक चालक कर्तव्यावर होता. कर्तव्यावरील चालकासह कर्मचारी जागृत अवस्थेत उपस्थित होते.

*** सर्वच कर्मचारी जागे--

अचलपूर नगर पालिकेतील अग्निशमन दलाच्या कार्यालयात रात्रपाळीला एक चालक आणि दोन मदतनीस कर्तव्यावर हजर होते. यातील हे तीनही कर्मचारी जागे होते. एकमेकांशी गप्पा करीत रात्र जागून काढताना अनाहूत फायर कॉलकडेही त्यांचे कान टवकारले होते.

नियम काय सांगतो?

अग्निशमन ही अत्यावश्यक सेवा आहे. नगर परिषदेच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन विभागातील पदसंख्या मान्य आहे. अग्निशमन विभागात कार्यरत कर्मचारी, अधिकारी, फायरमन, चालक, मदतनीस या सर्वांना आठवड्यातील सातही दिवस २४ तास सतर्क राहणे आवश्यक आहे. ३० हजार ते एक लाख लोकसंख्येच्या नगर परिषदेला अग्निशमन विभागास दिवस पाळीमध्ये पुरेसे आवश्यक कर्मचारी विहित केले आहेत. रात्रपाळीमध्ये नियंत्रण कक्षामध्ये दोन कर्मचारी देण्यात आले असून आगीची वर्दी मिळाल्यानंतर आवश्यक कर्मचारी वर्ग बोलवून आगीच्या ठिकाणी गाडी पाठवायची आहे.

१ ते २ लाख लोकसंख्येच्या नगरपरिषदेतील अग्निशमन विभागासाठी दिवसपाळी व रात्रपाळी विहित केलेली आहे. रात्रपाळीमध्ये आगीची वर्दी मिळाल्यानंतर कमीत कमी एक अग्निशमन गाडी पाठवावी. दुसरी गाडी पाठविणे आवश्यक असल्यास दिवसपाळीतील कर्मचाऱ्यांना बोलावून ती दुसरी गाडी पाठवावी.

** अग्निशमन विभागप्रमुखाचा कोट--

अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. मनुष्यबळ नसल्यामुळे या अत्यावश्यक सेवेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून फायर कॉल अटेंड केले जात आहेत.

- संदेश जोगदंड, अग्निशमन पर्यवेक्षक, नगर परिषद अचलपूर.

दिनांक13/09/21 फोटो