शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या संपामुळे गावगाड्याचा कारभार ठप्प

By admin | Updated: July 17, 2014 23:51 IST

मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची

चांदूरबाजार : मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनकडून होत आहे. ग्रामसेवकांच्या संपामुळे तालुक्यातील ६० ग्रामपंंचायतींचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. यात रोजगार हमी योजना अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना, बीआरजीएफ योजना, शौचालय बांधकाम तेरावा वित्त आयोग योजना, वृक्षलागवड योजना, पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले यांच्यासह इतर सर्वच कामकाज ठप्प झाल्यामुळे गावगाड्याच्या विकासाचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.२ जुलैपासून ग्रामसेवकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता लागणारे जन्म तारखेचा दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची फारच ओढाताण होत आहे. तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी दिवाबत्ती, सार्वजनिक आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आदी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. निर्मल भारत अभियानअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी अनुदानाची वाटपेही रखडली आहे. त्यामुळे शौचालयांची कामेही ठप्प पडली आहेत. त्याचप्रमाणे घरकुलाची देयके ही प्रलंबित आहेत. वृक्ष लागवडीची प्राथमिक स्वरुपाची कामे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणीही थांबली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची मजुरी व कुशल कामगारांची देयके मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोेष निर्माण झाला आहे.आधीच तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींचा कारभार ४४ ग्रामसेवक पाहत आहेत. यात पाच ग्रामसेवक कंत्राटी असून ३९ ग्रामसेवक नियमित आहेत. यात ग्राम विकास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ग्रामसेवकांची संख्या कमी असल्यामुळे काही ग्रामसेवकांकडे २ ते ३ ग्रामपंचायतीचा कारभार एकाच ग्रामसेवकाकडे आहे. त्यामुळे रेंगाळलेला ग्रामपंचायतींचा कारभार या संपामुळे ढेपाळलेला आहे. यावर येत्या २ ते ३ दिवसांत यशस्वी तोडगा न निघाल्यास ग्रामीण नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या रोषाचे परिवर्तन उद्रेकात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)