शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शेतकऱ्यांमागे दुष्काळाची साडेसाती

By admin | Updated: December 9, 2015 00:26 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी जर्जर झाला आहे. शेतकऱ्यांची स्थितीचा मागील सहा वर्षांचा....

सुमित हरकुट चांदूरबाजारशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी जर्जर झाला आहे. शेतकऱ्यांची स्थितीचा मागील सहा वर्षांचा मागोवा घेतला असता एक वर्षाचा अपवाद वगळता पाच वर्षे शेतकरी दुष्काळात होरपळत असल्याचे स्पष्ट होते. २०१०-१० ते २०११-१६ या सहा वर्षाच्या कालावधीत फक्त २०१२-१३ वर्ष वगळला असता इतर सर्व वर्षे शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागल्याचे जाणवते. ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्यास शासनाकडून दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केली जाते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना नाममात्र सवलती दिल्या जातात. नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली किरकोळ मदत दिल्या जाते. या मदतीवर शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. त्याचसोबत इतर जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या जीवाची घालमेल होते. हा दुष्काळरुपी साडेसातीसह सरकाररुपी राहूचा कोपच म्हणावा लागेल. खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी तर रबीतील गहू, हरभरा ही प्रमुख पिके आहेत. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ८१५ किलोमीटर एवढी असतांना पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे. खरिपातील पिकांना आवश्यक वेळी पाऊस न आल्याने सतत शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मागील ३-४ रबी हंगाम अवेळी पाऊस व गारपीटीने धुतला गेला आहे. यावर्षीचा रबी हंगाम अति उष्णतामानामुळे हातून गेल्यातच जमा आहे. या सततच्या नैसर्गिक आपत्तींना व शासनाचा शेतकरी विरोधी धोरणांना शेतकरी आता पुरता कंटाळलेला आहे. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख १५ हजार तर रब्बीचे १ लाख ८७ हजार हेक्टर इतके आहे. यापैकी अंदाजे २ लाख हेक्टर जमीन हलकी व उथळ आहे. २.१९ लाख हेक्टर जमीन मध्यम तर ३.७५ लाख हेक्टर जमीन भारी स्वरुपाची आहे. यापैकी १३ टक्के म्हणजे १ लाख ६० हजार हेक्टर इतके क्षेत्र खारपाणपट्ट्यातील आहे. नैसर्गिक व भौगोलिक स्थितीचा एकंदरीत स्थितीचा विचार करता खरीपच हा शेतकऱ्यांचा मुख्य व महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात ४ लाख ५३३ हजार ९७४ इतकी शेतकरी संख्या असून यापैकी अल्पभूधारक ४१ टक्के व ३४ टक्के अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यासोबत शेतकरी संख्येच्या चौपट कुटुंबे फक्त शेतमजुरीवरच आपला उदरनिर्वाह करतात. त्यानुसार अंदाजे १८ लाख कुटुंब जिल्हाभरातून फक्त शेतीवरच जगतात. ही स्थिती फक्त अमरावती जिल्ह्याची आहे.