शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

३० हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 00:03 IST

रोहिणी व मृग नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून वेळेवर व समाधानकारक असल्याचा ....

पाऊस बेपत्ता : शेतकऱ्यांसमोर नवे संकटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रोहिणी व मृग नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून वेळेवर व समाधानकारक असल्याचा दुजोरा दिल्याने जिल्ह्यातील ३८ हजार ७४४ शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे क्षेत्र वगळता किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पेरण्यांवर मोड येण्याची शक्यता आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मृग नक्षत्रापूर्वी शेतकऱ्यांनी खरिपपूर्व मशागत केली. पावसाच्या अपेक्षेने पेरणी केली. राज्यात मान्सूनचे आगमन देखील झाले. विदर्भाच्या उंबरठ्यावर तो पोहोचला. अगदी बुलडाण्यापर्यंत आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. नंतर मात्र त्याचा प्रवास थबकला.२३ दिवसांत फक्त ६९ मिमी पाऊसअमरावती : जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बिजांकुरण झालेच नाही. त्यामुळे बियाणे कुजू लागले. जेथे बिजांकुरण झाल, त्याठिकाणी उगवलेली इवलीशी रोपे करपू लागली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार १०२ हेक्टरक्षेत्राचे नियोजन आहे. यापैकी ३८ हजार ७४४ हेक्टरक्षेत्रात गुरूवारपर्यंत पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ७१३ हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. धान दोन हजार ८७९ हेक्टर, ज्वारी दोन हजार ९६ हेक्टर, मका दोन हजार ४६५ हेक्टर, असे एकूण सात हजार ४५० हेक्टर तृणधान्य, तसेच तूर पाच हजार एक हेक्टर, १५ हेक्टर मूग, उडिद दोन हेक्टर, असे एकूण पाच हजार १८ हेक्टर कडधान्य व सात हजार ४९४ हेक्टर सोयाबीन, भुईमूग २२ हेक्टर, असे एकूण सात हजार ५१६ हेक्टर गळित धान्य व कापूस १८ हजार ७१३ हेक्टर तसेच ऊस व अन्य पिकांची पेरणी झाली आहे. यापैकी किमान ३० हजार हेक्टरक्षेत्रात पावसाअभावी दुबार पेरणीची शक्यता आहे.जिल्ह्यात १ ते २३ जून दरम्यान १११.९ मिमी सरासरी पाऊस पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्ष ६९.२ मिमी पाऊस पडला आहे. ही ६१.८ टक्केवारी आहे. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ७१.२, भातकुली ७१.२, नांदगाव ८६.६,चांदूररेल्वे ६९.५, धामणगाव रेल्वे ७८.८, तिवसा ६९, मोर्शी ७२.६, वरुड ४५.६,अचलपूर ५९.७, चांदूरबाजार ५४.९, दर्यापूर ७६.६, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७१.२, व चिखलदरा तालुक्यात १०२ मिमी पाऊस पडला आहे.अशी आहे तालुकानिहाय पेरणीजिल्ह्यात सद्यस्थितीत ३८,७४४ हेक्टरक्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४१ टक्के म्हणजे १८,९२९ हेक्टरमध्ये धारणी तालुक्यात पेरणी झाली आहे. अमरावती ४१४ हेक्टर, भातकुली २४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३०८ हेक्टर, चांदूररेल्वे १३० हेक्टर, तिवसा २८४ हेक्टर, मोर्शी २,९२९ हेक्टर, वरूड ३,०९३ हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर,अंजनगाव सुर्जी ४९० हेक्टर, अचलपूर ७७६ हेक्टर,चांदूरबाजार १,१३१ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १० हजार तीन हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामधील किमान ३० हजार हेक्टरक्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे.