चार दिवसांचा अल्टिमेटम : मोर्चेकऱ्यांशी बैठकअमरावती : सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिवाळीपुर्वी द्यावी,या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणाऱ्या महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमसभेपर्यत संप मागे घेतला आहे.२० आॅक्टोबरच्या आमसभेत थकबाकी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन मिळाल्यानंतर संप चार दिवसांसाठी संस्थगित करण्यात आले.महापालिकेतील १५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन पुकारल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी दुपारी संपकऱ्यांशी चर्चा करण्यात आली.आयुक्त हेमंत पवार ,महापौर चरणजितसिंग कौर नंदा,स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर ,विरोधी पक्षनेता प्रविण हरमकर ,विलास इंगोले आदींच्या उपस्थितीत ३१ कोटींची थकबाकी देण्याबाबत चर्चा करण्यात आली.आपण हा विषय आमसभेत ठेवला असून थकबाकी द्यायची की कसे? याचा निर्णय आमसभेला घ्यायचा आहे.त्यानंतर आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल,असे आयुक्तांनी सांगितले.महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सुध्दा प्रशासन कर्मचाऱ्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगून संप मागे घेण्याच्या सुचना केली.त्यानंतर संप चार दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचे प्रल्हाद कोतवाल,गणेश तंबोले ,कमलाकर जोशी , मानवीराज दंदे आदींनी केली.४८ तासांचा अल्टिमेटमतत्पुर्वी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता..महानगरपालिका कर्मचारी -कामगार संघ आणि सफाई कामगार संघटनेने या आंदोलनाची हाक दिल्याने महापालिकेतील कामकाज प्रभावित झाले होते.महापालिका कर्मचाऱ्यांच्या आांदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही शनिवारी संपकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.अन्यथा शिस्तभंगाची कारवाईसंपात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ४८ तासाच्या आत कामावर यावे ,अन्यथा त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाी करण्यात येईल,असा इशारा उपायुक्त विनायक औगड यांनी दिला होता..काही अधिकारी कर्मचारी बेकायदेशिर संपात सहभागी झाल्याने महापालिकेचे कामकाज खोळंबले असून जनमानसात महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचे उपायुक्तांनी म्हटले जाहीर सूचनेद्वारे म्हटले होते.
महापालिका कर्मचाऱ्यांचा संप आमसभेपर्यंत स्थगित
By admin | Updated: October 16, 2016 00:14 IST