तळेगाव दशासर : कृषक सुधार मंडळ द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. धामणगाव तालुक्यातील तळेगाव येथे जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. परिसरातील मुलींना मुक्तपणे शिक्षण घेता यावे म्हणून शिक्षण महर्षी बापूसाहेब देशमुख यांनी सन २०८३-८४ मध्ये कृषक सुधार मंडळाद्वारे माध्यमिक कन्या विद्यालय स्वत:चे जुन्या मातीचे जागेत सुरू केले. सुमारे ३१ वर्षांपासून शेकडो विद्यार्थिनींनी शिक्षणाचा लाभ घेतला.यंदा या शाळेचा दर्शनी भाग कोसळला असून दक्षिण-पश्चिम भागाची भिंत पडली आहे. तसेच दक्षिणेकडील मुख्य इमारतीची मागील पूर्ण भिंत शिकस्त असल्याने कधीही अपघात होऊ शकते. या शाळेत ५ ते १० पर्यंत वर्ग असून शेकडो विद्यार्थिनी व शिक्षक वृंद जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. याबाबत शाळा समितीने कृषक सुधार मंडळ अध्यक्षांना पत्राद्वारे कळविले आहे.
जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By admin | Updated: July 29, 2015 00:22 IST