शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

क्यूरिंगअभावी महामार्गाची कामे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:26 IST

पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमानी : पाणी टँकर वाढविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचांदुर बाजार : पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.परतवाडा ते मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या चांदूर बाजार भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राट एच. जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. कंत्रातदारातर्फे प्रचंड खनन करून परिसरातील पिवळी माती रास्ता बांधकामत वापरण्यात येत आहे. मात्र, या मातीच्या नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना कंत्रातदारातर्फे घाईने काँक्रीटचा मलमा चढविण्यात येत आहे. या रस्त्यावर पाणीचे क्यूरिंग केले जात नासल्याने हे काँक्रिट कच्चे राहिले आहे. या निकृष्ट काँक्रिट रस्त्यावरून कोणीही वाहतूक करू नये, याकरिता रस्त्यावर काटेरी झाडे टाकण्यात आले आहे. या महामार्गाचे काँक्रिटचा पहिलाच थर निकृष्ट झाला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावरील बांधकामात फक्त ३ पाण्याचे टँकर सुरू असून, केवळ रस्त्यावरील पिवळी माती उडू नये या करिता वापरले जात आहे. या करिता शेतकऱ्याचा शेतातील पाणी बोअरवेलने घेऊन टँकरच्या मदतीने मातीवर पाणी टाकले जात आहे. त्यामुळे केवळ मातीवर पाणी मारल्याने हा काँक्रिट रस्ता दर्जेदार कसा बनणार, असा प्रश्न रस्त्यावरून वाहतूक करणारे नागरिकांतर्फे केला जात आहे.काँक्रिट रस्त्याची पोत टिकविण्यासाठी त्या काँक्रिट रस्त्यावर पाणी टाकणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदाराचा मनमानी कारभार व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे होत आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचे शासकीय अधिकाºयांशी साटेलोटे असल्याने कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी आपला कारभार चालवीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.