शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

चौफेर नाकाबंदीमुळे शेतकऱ्यांचा संप उग्र

By admin | Updated: June 11, 2017 00:02 IST

देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली.

बच्चू कडू : मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली. त्या असंतोषातून शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आंदोलन पुकारले आहे. शासनाने रविवारी तोडगा न काढल्यास १२ आणि १३ जूनचे आंदोलन अधिक उग्र स्वरुपाचे असेल, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका त्यांनी केली. न भूतो न भविष्यती संपअमरावती : पक्ष कार्यकर्ते शेतकरी नाहीत का? असा सवाल आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आ.बच्चू कडू यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एका गावातून सुरू झालेले आंदोलन राज्यातच नव्हे, तर देशात पसरते, ही भूतो न भविष्यती’ अशी बाब असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नेत्याची गरज नसल्याचे या आंदोलनाने दाखवून दिल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या काळातही आंदोलने झालीत. मात्र शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणारे भाजप सरकार असू शकते, हे या सत्ताधिशांनी दर्शवून दिल्याचे ते म्हणाले. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाड्याने आणलेल्या लोकांचे असल्याचे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री वायफळ असल्याची टीका त्यांनी केली. इंग्रज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगतसिंगांनी आवाज करणारा बॉम्ब फोडला होता. आताचे सत्ताधीशही बहिरे असल्याने त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी आपण बॉम्ब फेकण्याची भाषा वापरली असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी माझ्यासारखा एखादा आमदार शहीद झाला, तर काहीच बिघडणार नाही. आंदोलनकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालविल्याचा आरोप त्यांनी केला. १२ व १३ जूनचे आंदोलन अतिशय उग्र राहील. त्यात समस्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेले हे आंदोलन असून नेत्यांविना सुरू असलेले हे आंदोलन न भूतो न भविष्यती असल्याचे ते म्हणाले.- तर त्यांनी तारीख सांगावीबच्चू कडू मारायला आणि मरायला भीत नाही. ज्यांना कुणाला मला मारायचे असेल तर त्यांनी तारीख सांगावी, अमरावतीच्या जयस्तंभ चौकात मी एकटाच येईल. शेतकऱ्यांसाठी मला हाणलेली चपराक माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असेही त्यांनी सप्ष्ट केले. यू-टर्न घेणाऱ्यांमधला बच्चू नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.आयएएसना द्याव्यात गाई म्हशी शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र दुग्ध व्यवसायही कमालीचा बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा त्यांनाही म्हशी आणि बकऱ्या द्यव्यात आणि त्यांच्या वेतनातील ती तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे मत त्यांनी मांडले.भाजप कपटी, आतल्या गाठीचेभाजपवाले कपटी आहेत. ते अणुबॉम्ब टाकून भडकून टाकतील तरीही माहित होणार नाही,असा टोला आ.बच्चू कडू यांनी दिला. सध्या भाजपवालेच केवळ शेतकरी आहेत. त्यांना वगळून साऱ्यांना ते गुंडच समजतात. त्यामुळे आता आम्ही शेतकरी की दहशतवादी हे जाणून घेण्यासाठी आता डीएनए चाचणी करावी काय? असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.