शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

वीटभट्ट्यांवरील राखेच्या धुळीने बडनेरा हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:10 IST

विटा बनविण्यासाठी औष्णिक वीज केंद्रात वापरलेल्या कोळशाच्या राखेचा वापर वीटभट्टीधारकांकडून होत असल्याने बडनेराच्या आसमंतात तिची धूळ पसरली आहे. त्यापासून खोकला व डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण कुणाचेच नसल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देनियंत्रण कुणाचे? : खोकला, डोळ्यांचे आजार वाढले

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : विटा बनविण्यासाठी औष्णिक वीज केंद्रात वापरलेल्या कोळशाच्या राखेचा वापर वीटभट्टीधारकांकडून होत असल्याने बडनेराच्या आसमंतात तिची धूळ पसरली आहे. त्यापासून खोकला व डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण कुणाचेच नसल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत.बडनेरा, अंजनगाव बारी, वडद परिसरात मोठ्या संख्येत वीटभट्ट्या आहेत. सध्या विटा तयार करण्याच्या कामाला वीटभट्टीधारक लागले आहेत. सोफिया प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात राख आहे. तेथून ट्रकने ही राख वीटभट्टीकडे आणली जाते. या वाहतूकदरम्यान रस्त्याने सांडत जाणाऱ्या राखेमुळे ट्रकच्या मागे असणाºया वाहनचालकांना धुळीचा मनस्ताप सहन करावा लागतो. बडनेऱ्यातील कोंडेश्वर तसेच अंजनगाव बारी, वडद मार्गावर ही स्थिती अनुभवास येत आहे. येथे सध्या राखेचे ढिगारे लागले आहेत. जिकडे पाहाल तिकडे राखच दिसून पडते. कोंडेश्वरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अंजनगाव बारी मार्गावर बरीच महाविद्यालये आहेत. शेकडोंच्या संख्येत विद्यार्थी या मार्गाहून ये-जा करतात. अंजनगावकडे जाणाऱ्यांचीदेखील मोठी वर्दळ या मार्गावर आहे. धुळीमुळे मोठा मनस्ताप व त्यापासून शारीरिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत असले तरी याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत.वीटभट्ट्या बनल्या त्रासदायकहिवाळा सुरू झाल्याने वीटभट्टी रचण्याचे काम सुरू आहे. नव्या विटांसाठी फ्लाय अ‍ॅशचे ढीग भट्टीच्या परिसरात रचले जात आहेत. त्याच्या कणांमुळे दमेकरी तसेच धुळीची अ‍ॅलर्जी असणाºया नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात वीटभट्ट्यांतून निघणारे उष्ण झोत या मार्गाने जाणाºयांना भाजून काढतात. एकूणच बडनेºयातील मार्गालगतच्या वीटभट्ट्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अशा वीटभट्टीचालकांवर प्रशासनाने ठोस कारवाई करावी, असे बोलले जात आहे.