शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत गुरुजी झोपले वर्गखोलीत; विद्यार्थी व्हरांड्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 19:39 IST

शिक्षक वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपत असल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजता तालुक्यातील मांजरकापडी जिल्हा परिषद शाळेत गावक-यांनी उघडकीस आणला.

चिखलदरा (अमरावती): विद्यार्थ्यांना व्हरांड्यात काढून शिक्षक वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपत असल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजता तालुक्यातील मांजरकापडी जिल्हा परिषद शाळेत गावक-यांनी उघडकीस आणला. या संतापजनक प्रकाराने मेळघाटातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ पुन्हा पुढे झाला आहे. नामदेव मेश्राम असे  शिक्षकाचे नाव आहे. मांजरकापडी येथे गत महिन्यात २७ तारखेला ते रुजू झाले. तालुक्यातील गौरखेडा बाजार ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकापडी गावाचा समावेश आहे. येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. चार वर्गांमध्ये एकूण २९  विद्यार्थी आहेत. त्यासाठी दोन शिक्षक आहेत. गौरखेडा बाजार हे माजी आमदार केवलराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे व जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे या आदिवासी नेत्यांचे गाव आहे. येथेच हा प्रकार असेल, तर इतर शाळांचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. सदर शिक्षक यापूर्वीसुद्धा मागील शाळेवर वादग्रस्त ठरल्याची माहिती आहे. शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे. —————-गावक-यांची धडक, शिक्षकाची अरेरावी शाळेच्या दुस-या दिवसापासूनच नामदेव मेश्राम वर्गात मद्यपान करून येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावरून पालकांनी पाळत ठेवली. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास सरपंच सोनाली अल्केश महल्ले, पुनाय बेलसरे, शेवंती दारसिंबे, अल्केश महल्ले, उपसरपंच रामकिसन बेलसरे, मोतीलाल भासकर विलास बेलसरेसह ५०ते ६० आदिवासींनी शाळेवर धडक दिली. त्यांना विद्यार्थी व्हरांड्यात, तर शिक्षक नामदेव मेश्राम हे वर्गखोलीत झोपल्याचे आढळून आले. शिक्षकाला उठवून त्यांनी विचारले असता, आजारी असल्याचा आणि शासकीय कामात अडथळा केल्याचे गुन्हे तुमच्यावर दाखल करणार असल्याचा दम दिला. याबाबत बुधवारी सरपंच सोनाली अल्केश महल्ले यांनी गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार केली. —————-विद्यार्थ्यांना आणावा लागतो तंबाखू-चुनाशालेय सत्राच्या महिन्यापूर्वीच मांजरकापडी येथील जिल्हा परिषद शाळा वादग्रस्त ठरली. शिक्षक नामदेव मेश्राम हे विद्यार्थ्यांना तंबाखू-चुना आणायला लावत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला.  ——————-झोपेचा नित्यक्रम वादग्रस्त शिक्षक नामदेव मेश्राम यांच्याकडे इयत्ता दुसरा आणि आणि चौथा वर्ग आहे. दररोज दुपारी १२ वाजता शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना व्हरांड्यात काढून ते स्वत: वर्गखोली झोप घेतात, असा आदिवासी पालकांचा आरोप आहे. ————-मांजरकापडी येथील शाळेच्या वर्गखोलीत मंगळवारी शिक्षक नामदेव मेश्राम दारू पिऊन झोपले होते. विद्यार्थी व्हरांड्यात आढळून आले. आम्हालाच त्यांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. तशी तक्रार गटशिक्षणाधिका-यांकडे करण्यात आली आहे.- सोनाली अल्केश महल्ले, सरपंच, गौरखेडा बाजार—————- सदर प्रकार गंभीर आहे. शिक्षकाबद्दल तक्रार सरपंच व गावक-यांनी केली आहे. चौकशी करून कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल.- संदीप बोडखे, गटशिक्षणाधिकारी, चिखलदरा