शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रमभर पाणी ६० रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:48 IST

तालुक्यातील शेंदोळा बुजरूक हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. मार्च महिन्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावातील सर्व विहिरी, बोर व तलाव आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे, तर खासगी पुरवठादाराकडून एक ड्रम पाण्यासाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भीषण पाणीटंचाई : शेंदोळ्यात खासगी टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शेंदोळा बुजरूक हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. मार्च महिन्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावातील सर्व विहिरी, बोर व तलाव आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे, तर खासगी पुरवठादाराकडून एक ड्रम पाण्यासाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.नागरिकांना हक्काचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याने शासनाच्या धोरणांबाबत नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या शेंदोळा गावात ग्रामपंचायतच्या तीन बोअर, सात हातपंप, सात सार्वजनिक विहिरी आहेत. हे जलस्रोत आटले, तर गावाला पाणीपुरवठा करणारा तलावही कोरडा पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. तूर्तास एका खासगी टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ते पाणी पुरेसे नाही. गतवर्षीसुद्धा शेंदोळा येथे दोन महिने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. हीच स्थिती यंदा ओढवते की काय, या भीतीने शेंदोळा ग्रामस्थांची गाळण उडाली आहे. तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.दहा दिवसानंतर पाणीपुरवठागावात दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने येथे खासगी टँकरद्वारे पाणी येत आहे. एक ड्रम पाण्यासाठी नागरिकांकडून ६० रुपये वसूल केले जातात. ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत.गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअर, विहिरी आटल्या. यामुळे १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मी स्वखर्चाने गावात टँकर लावला. प्रशासनाने आणखी टँकर लावून ही समस्या नियंत्रणात आणावी.- वैशाली लसनापुरेसरपंच, शेंदोळा बु