शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मद्यपींनो, आनंद लुटा पण आॅनलाईन परवाना घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:27 IST

रविवारी, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मौजमजा, आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे.

ठळक मुद्दे‘एक्साईज’चे आवाहन : शंभरापेक्षा कमी व्यक्तींकरिता सात हजार रुपये शुल्क

आॅनलाईन लोकमतअमरावती : रविवारी, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मौजमजा, आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. यात मद्यपीदेखील मागे असणार नाहीत. त्यामुळे नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य प्राशनासाठी आॅनलाइन परवाना बंधनकारक केला आहे.‘थर्टी फर्स्ट’ची अनेकांना प्रतीक्षा असते. कोणी सहलीवर, पर्यटनस्थळी, तर कोणी घरीच आनंद लुटण्याचे प्लँनिग आखतात. विशेषत: मद्यपींना ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना त्यांच्या आनंदात व्यत्यय येऊ नये, याची एक्साइजने काळजी घेतली आहे. हॉटेल, ढाबे, संस्था, उद्यान, फार्म हाऊस अथवा आस्थापनेत सामूहिकपणे ‘ओली पार्टी’ करायची असल्यास दारू प्राशन करण्यासाठी अधिकृत परवाना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १०० पेक्षा संख्या कमी असल्यास ‘ओल्या पार्टी’साठी सात हजार रुपयांचे परवाना शुल्क, तर १०० पेक्षा जास्त संख्या असल्यास त्याकरिता १० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘सर्व्हिस’ अंतर्गत परवाने मिळतील, असे स्पष्ट केले आहे. यासोबतच मद्य प्राशन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद घेताना इतरांना त्रास होणार नाही, या अटी-शर्तींवर आॅनलाइन परवाने दिले जाणार आहेत.दारूची अवैध वाहतूक, विक्री रोखण्यासाठी पथकनववर्षाच्या स्वागतप्रसंगी अवैध दारूविक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी स्वतंत्र पथके गठित करण्यात आली आहे. याशिवाय सीमेवर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.गुन्हेगाराच्या घरांची झडती, पोलीस पथके सज्जनववर्षाच्या स्वागतापूर्वीच पोलिसांचे सरप्राइज चेकींग व कोम्बिंग आॅपरेशन, ४८ हद्दपारांची तपासणी, रेकॉर्डवरील टॉप टेन गुन्हेगारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राइव्हसाठी २९ ब्रिथ अ‍ॅनालायझर व दोन स्पीड गनचा वापर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त हॉटेल, लॉन, लॉज, मंगल कार्यालये तसेच गुन्हेगारांच्या आश्रयस्थानावर पोलिसांची चौकस नजर राहणार आहे. नववर्षाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शुक्रवारी बैठक बोलावून सर्व अधिकारी व कर्मचाºयांना सूचना दिल्या आहेत.‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना मद्यपींकडून धुमाकूळ किंवा सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येऊ नये, ही खबरदारी एक्साइज घेते. यंदा मद्यपींना दारू प्राशन करण्यासाठी आॅनलाइन परवाने देण्याची व्यवस्था आहे तसेच अवैध दारु विक्री, वाहतूक पथकाद्वारे रोखली जाणार आहे.- प्रमोद सोनोने, अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग