शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
4
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
5
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
6
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
7
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
8
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
9
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
10
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
11
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
12
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
13
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
14
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
15
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
16
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
17
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
18
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
19
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
20
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 

रेती उत्खननामुळे ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

चार वर्षांपासून तालुका पाण्याअभावी दुष्काळात होरपळतो आहे. या भागातील विहिरी उन्हाळ्यापूर्वीच आटल्या आहेत. ३००-३५० फूट खोल खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागत होते. मात्र, ती पातळी आता १००० ते १५०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहानूर नदीचे खोलीकरण व जलसंधारण महत्त्वाचे होते. मात्र, तसे झाले नाही. १० ते १५ वर्षांपूर्वी शहानूर नदीचे पात्र अतिशय व्यापक होते.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाकडून अभय : नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर, नदीपात्रात मोठमोठे खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शहरालगतच्या शहानूर नदीचे पात्र रेतीतस्करांनी लक्ष्य केले आहे. नदीपात्रातील हजारो ब्रास रेतीची अवैधरीत्या उत्खनन करून अवैध वाहतूक केली जाते. येथील शहरवासीयांसह अकोटकडे जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेतून ही रेतीचोरी सुटत नाही. मात्र, महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. या रेती उत्खननामुळे तालुक्यावर ‘पाणीबाणी’ ओढविण्याचे दाट संकेत आहेत.चार वर्षांपासून तालुका पाण्याअभावी दुष्काळात होरपळतो आहे. या भागातील विहिरी उन्हाळ्यापूर्वीच आटल्या आहेत. ३००-३५० फूट खोल खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागत होते. मात्र, ती पातळी आता १००० ते १५०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहानूर नदीचे खोलीकरण व जलसंधारण महत्त्वाचे होते. मात्र, तसे झाले नाही. १० ते १५ वर्षांपूर्वी शहानूर नदीचे पात्र अतिशय व्यापक होते. पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर होत होता. मात्र, अलीकडे शहानूर नदीपात्राला रेतीतस्करांची नजर लागली आहे. या नदीपात्रातून रोज हजारो ब्रास रेती काढली जाते. त्याची दिवसाढवळ्या वाहतूक केली जाते. त्यासाठी बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर वापरले जातात. नदीपात्रात मोठमोठे खड्डे रेती उत्खननाचे पुरावे ठरले आहेत. लाखो रुपये खर्च करुन नगरपालिकेच्या वतीने १५ वर्षांपूर्वी खोडगाव मार्गावरील नर्सरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. ती नर्सरी आज आॅक्सिजन पार्क म्हणून दिमाखात उभी आहे. मात्र, या नर्सरीमधील झाडांच्या बुंध्यातून रेती चोरीला गेली. महसूल प्रशासनाने रेती तस्करांवर अंकुश लावला नाही, तर ही नर्सरीसुद्धा नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, ना तहसीलदार फिरकले, ना त्यांचे अधिनिस्थ पथक. त्यामुळे कारवाई कोण करेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.खोडगाव, देवगाव मार्गावरील शहानूर पात्रातील, नाल्यातील रेतीचे उत्खनन अतिशय चुकीचे आहे. तहसीलदार कारवाई करीत नसतील, तर आपण स्वत: पाहणी करून रेतीचोरांविरूद्ध कारवाई करू.- प्रियंका आंबेकर,उपविभागीय अधिकारी, दर्यापूर