शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मशिदीवरील भोंगे खाली उतरवू देणार नाही; रिपाईंचे भीमसैनिक संरक्षण देणार, राजेंद्र गवईंचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 18:43 IST

काही समाज कंटकांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हाणून पाडतील, अल्पसंख्याक बांधवांना शांतता राखण्यासाठी भीमसैनिक मदत करतील, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.

अमरावती : राज्यात कोणत्याही मशिदीवरील भोंगे खाली उतरणार नाही. काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केल्यास आपण ते हाणून पाडू, असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंडिया (गवई गट) राष्ट्रीय सरचटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

डा. गवई यांच्या मते, अमरावती लाेकसभा मतदार संघातून गवई कुटुंब गत पाच दशकापासून निवडणूक लढवितआहे. आम्हाला अल्पसंख्याक मतदारांनी भरभरून प्रेम दिले आहे. मात्र, आजमितीला मशिदीवरील भोंगे काढणे आणि हनुमान चालिसा पठण करणे यावरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. रिपाईं हा पक्ष भारतीय संविधानावर विश्वास ठेवतो. या देशात समाज, धर्म कोणताही असो, तो गुण्यागोविंदाने राहिला पाहिजे. त्याचे अधिकार त्याला मिळावे, हीच भावना आहे. मात्र, काही समाज कंटकांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हाणून पाडतील, अल्पसंख्याक बांधवांना शांतता राखण्यासाठी भीमसैनिक मदत करतील, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले. भोंग्यासाठी सर्वानाच सारखे नियम आहेत. परंतु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गृह विभागाने मिरवणुकीबाबत योग्य प्रतिसाद दिला, ही खंत देखील डॉ, गवई यांनी व्यक्त केली. मनसेच्या ‘त्या’ मतास विरोध

मुंबई येथे २५ एप्रिल रोजी गृह विभागाने सर्व पक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासह मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन प्रभू देसाई मी देखील उपस्थित होतो. यावेळी राज ठाकरे यांनी भूमिका बदलावी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारला मदत करावी, असे मत नोंदविले. मात्र, माझ्या मतास मनसेने विरोध दर्शविला आणि ३ मे रोजी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा निर्धार दर्शविला. मात्र, भीमसैनिक भोंगे कदापीही उरवू देणार नाही, असा ठाम निर्धार डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMosqueमशिद