शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

स्मार्टसिटीसाठी १६१७ कोटींचा ‘डीपीआर’

By admin | Updated: March 21, 2017 00:14 IST

केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठी अमरावती महापालिकेने १६१७ कोटींच्या प्रस्तावावर सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब केले.

तीन घटकांचा समावेश: पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण अमरावती : केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठी अमरावती महापालिकेने १६१७ कोटींच्या प्रस्तावावर सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब केले. यात ग्रीनफिल्डसह पॅनसिटी आणि रेट्रोफिटींग या तीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा संपुर्ण प्रस्ताव मंगळवार किंवा बुधवारी राज्यशासनाकडे सुपूर्द केला जाईल.आलिया कंन्सलटंसीने दिलेल्या प्रस्तावावर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसह आ.सुनिल देशमुख यांच्यासह उपमहापौर, पक्षनेते, स्थायी समितीचे सभापती व अन्य सदस्यांसमोर चर्चा करण्यात आली. यथा सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट सिटीचा पहिला प्रस्ताव ५५०० कोटी, दुसरा प्रस्ताव २२६८ कोटींचा तर हा तिसरा प्रस्ताव केवळ १६१७ कोटींचा करण्यात आला आहे. वडद येथिल ज्या भूधारकांनी लेखी संमती दिली त्यांच्या ८३ एकर जमिनीचा ग्रीनफिल्ड अंतर्गत घटकान्वये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय छत्रीतलावालगतच्या ५५ ्एकर क्षेत्राचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. अ‍ॅग्रोटेक बिझनेस डिस्ट्रीक्ट म्हणून यात शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी विविध विकासात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. रेट्रोफिटींगमध्ये एकूण ६५५ एकर क्षेत्र घतल्या गेले असून त्यावर अंदाजे ७०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात यशोदानगर आणि रुख्मिनेनगर भागाचा समावे करण्यात आा आहे. तर पॅनसिटीमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य भटकांचा समावेश करण्यात आला आहे. तर ग्रीनफिल्डमध्ये ट्रान्सपोर्टहब, एक्झीब्यूशन बिल्डिंग सह टाऊनसिटीचा समावेश आहे. यानंतरही वडद येथील जे भूधारक त्यांच्या जमिनीसंदर्भात लेखी संमती देतील, अशांच्या जमिनींचा अंतर्भाव प्रस्तावाच्या टप्पा दोनमध्ये करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)‘आलिया’ला खडसावलेस्मार्ट सिटीचा डीपीआर बनविण्याचे कंत्राट मुंबई स्थित आलिया कन्सल्टन्सीला देण्यात आले. मात्र, पहिल्या दोन प्रस्तावाप्रमाणे आताच्या तिसऱ्या प्रस्तावातही आलियाच्या वतीने कुठलाही पुढाकार घेण्यात आला नाही. हँडहोल्डिंग एजन्सीसह आयुक्त हेमंत पवार आणि त्यांच्या यंत्रणेने डीपीआरवर अंतिम शिक्कामोर्तब केले. आयुक्तांनी सोमवारी सादरीकरणादरम्यान आलियाच्या प्रतिनिधीची तिखट शब्दात खरडपट्टी काढली.स्मार्टसिटी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठी १६१७ कोटींच्या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले असून, बुधवारी हा प्रस्ताव राज्यशासनाकडे सुपूर्द करण्यात येईल. प्रस्ताव वस्तुस्थितीदर्शक आहे.- हेमंतकुमार पवारआयुक्त, महापालिका