शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पन्नी वेचणाऱ्या बादशाहचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:15 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : बादशाह नावाने ओळखले जाणाऱ्या सिद्धू ऊर्फ सिद्धार्थ नामदेव भगत (५०,रा. रमाबाई आंबेडकरनगर) याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने रविवारी सकाळी आशियाड कॉलनीत खळबळ उडाली. सिद्धू भगत याच्या डोक्याला गंभीर जखमा दिसून आल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय बळावला आहे. मात्र, पायºयावरून घसरून पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे सिद्धू भगतचा ...

ठळक मुद्देहत्या की अपघात? : आशियाड कॉलनीतील घटना

आॅनलाईन लोकमतअमरावती : बादशाह नावाने ओळखले जाणाऱ्या सिद्धू ऊर्फ सिद्धार्थ नामदेव भगत (५०,रा. रमाबाई आंबेडकरनगर) याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने रविवारी सकाळी आशियाड कॉलनीत खळबळ उडाली. सिद्धू भगत याच्या डोक्याला गंभीर जखमा दिसून आल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय बळावला आहे. मात्र, पायºयावरून घसरून पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे सिद्धू भगतचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे.सिद्धू भगत हा रमाबाई आंबेडकर नगरात बहिणीच्या घरी राहत होता. तो प्लास्टिक पन्नी वेचून जीवनचक्र चालवित होता. आशियाड कॉलनीतील एका कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात तो वास्तव्य करीत होता. त्याला बादशाह नावाने केल्यामुळे त्या परिसरातील नागरिक ओळखत होते. रविवारी सकाळी सिद्धू कॉम्प्लेक्सच्या पायºयाजवळ नग्न व मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यातून रक्त निघत असल्याचे पाहून त्याची हत्या केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. गाडगेनगर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे तपासणी केली असता श्वान त्याच ठिकाणी घुटमळला. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची तपासणी केली. सिद्धू रोज मद्य सेवन करीत होता. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूने जखमा असल्यामुळे तो पायऱ्यांवरून घसरून पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.मध्यरात्री सिद्धूची आरडाओरडशनिवारी रात्री २.३० च्या सुमारास सिद्धू आरडाओरडा करीत असल्याचे काही नागरिकांनी पोलिसांना सांगितले. या कॉम्प्लेक्समध्ये रात्रीच्या वेळी मद्यपी दारू पीत असल्याचीही बाब समोर आली आहे. त्यामुळे मध्यरात्रीदरम्यान सिद्धूवर हल्ला झाला असावा, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्हीची पाहणी असता मध्यरात्रीदरम्यान कुणीच कॉम्प्लेक्सच्या आवारात नसल्याचे आढळून आले.इसमाच्या डोक्याला मागून मार आहे. तो पायऱ्यावरून घसरून पडल्याची शक्यता आहे. आकस्मिक मृत्युची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे