शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गाढवांनाही पुरणपोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:42 IST

बैल पोळ्याला शेतकऱ्यांमध्ये जसे बैलाला महत्त्व अगदी, त्याचप्रमाणे गाढव पाळणाऱ्यांमध्ये या गाढवांना महत्त्व. तोच उत्साह आणि तीच प्रथाही जोपासण्यात आली. पोळ्याच्या दिवशी या गाढवांना आंघोळ घातली गेली. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले गेले. गाढवं सुंदर दिसावीत, यासाठी त्यांना कल्पकतेने रंगवण्याकडे त्यांचा कल होता. रंगवलेल्या गाढवांच्या गळ्यात फुलांच्या, मण्यांच्या, घुंगराच्या माळा घातल्या गेल्यात.

ठळक मुद्देपरंपरा । कामकरी गाढवांप्रति कृतज्ञता पथ्रोट येथे गाढवांचा पोळा

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बैल पोळ्याच्या दिवशी अचलपूर, हरम, खानजमानगर, आकोट, अंजनगाव येथे गाढवांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला गेला. त्यांचे पूजन करण्यात आले. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली.बैल पोळ्याला शेतकऱ्यांमध्ये जसे बैलाला महत्त्व अगदी, त्याचप्रमाणे गाढव पाळणाऱ्यांमध्ये या गाढवांना महत्त्व. तोच उत्साह आणि तीच प्रथाही जोपासण्यात आली. पोळ्याच्या दिवशी या गाढवांना आंघोळ घातली गेली. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले गेले. गाढवं सुंदर दिसावीत, यासाठी त्यांना कल्पकतेने रंगवण्याकडे त्यांचा कल होता. रंगवलेल्या गाढवांच्या गळ्यात फुलांच्या, मण्यांच्या, घुंगराच्या माळा घातल्या गेल्यात. जमेल ते अलंकार त्यांना चढविले गेले. हे करत असताना गाढवं पाळणाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता. सजवलेल्या गाढवांचे औक्षण केले गेले. गुलाल लावण्यात आला आणि पूजनानंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांच्यापुढे नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यादरम्यान दीड दिवस त्यांच्याकडून कुठलेही काम करवून घेतले गेले नाही. अचलपूर, हरम, खानजमानगर, आकोट, अंजनगाव येथेही याप्रकारे गाढवांचे पूजन झाले. पुरणपोळी खाऊ घालून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली.आकोटमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रामटेकपुऱ्यात पिंपळाच्या झाडाजवळ हा गाढवांचा पोळा भरतो. देऊळगाव राजाला गाढवांचा बाजार भरतो. गाढवांचे व्यापारीही त्यांना घेऊन विक्रीकरिता फिरस्तीवर असतात. या बाजारातील व्यापाºयांकडील गाढवं पाळणाऱ्यांनी विकत घेतली आहेत. हरम, खांजमानगर, अचलपूर येथूनही गाढवांची पिले विकत घेऊन त्यांचे संगोपन करणारे बऱ्यापैकी आहेत.अचलपूरमध्ये हजारांवर गाढव आहेत. अचलपुरात पोळा भरत नसला तरी बैल पोळ्याच्या दिवशी आम्ही त्यांना आंघोळ घालतो. रंगवतो, सजवतो, त्यांचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना भरवतो.- प्रदीप बावणे, अचलपूर.

टॅग्स :Socialसामाजिक