शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
4
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
5
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
6
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
7
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
8
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
9
'पैसे नाही, मला तूच पाहिजे!', वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'त्या' मागण्या, वेतनवाढही रोखली; कंटाळून नर्सने...
10
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
11
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
12
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
14
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
15
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
16
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
17
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
18
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
19
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
20
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम आवासच्या कारभाराविरुद्ध गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अनावश्यक प्रशासकीय त्रास सुरू असून, घरकूल लाभार्थींना धनादेश रक्कम देताना ‘मस्टर’ची अट लादल्याने हैराण झाले आहे. या योजनेत पारदर्शकता यावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व शहराध्यक्ष नीलेश शर्मा यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गाढव मोर्चा बस स्टँड ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मालटेकडी कार्यालय येथे पोहचला तेथे प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकूल  लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी सुशील गावंडे, नीलेश शर्मा, गजानन रेवाळकर, विपीन शिंगणे, साहिल सोलीव, प्रफुल्ल सानप, कुणाल विधळे, अनिरुद्ध होले, शैलेश राऊत, प्रतीक भोकरे, मंगेश पोल्हाड, अजित काळबांडे,  राजू येरहोकर, हेमंत बोबडे, शुभम पारोदे, दिग्विजय गायगोले, नितीन गावंडे, श्रीकांत तेलंग, कुणाल ठाकूर, निरंजन खडसे, वैभव तायडे, वैभव शिंदे, जावेद शेख, वैभव ठाकरे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Morchaमोर्चाNCPराष्ट्रवादी काँग्रेस