लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात शनिवारी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.अधिकारी, कर्मचारी क्रीडा महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी प्रथम नोंदणी करून सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी सामान्य रुगण्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. आशिष वाघमारे, डॉ. श्रीकांत झाकर्डे, संजय चौधरी, इर्विनच्या साधना शिरसाट, प्रीती तिखे, नितीन बोरकर, राहुल मेश्राम आदींनी सहभाग घेतला होता. रक्तदान शिबिरात ६१ कर्मचारी, अधिकारी यांनी रक्तदान केले. यात १४ महिलाचा सहभाग होता. गरजू रुग्णांना याची मदत होणार आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून हा उपक्रम दरवर्षी क्रीडा महोत्सवात आयोजित केला जातो. ही कल्पना सीईओ अमोल येडगे यांनी मांडली होती. ती प्रत्यक्ष आणली. यावेळी त्यांनीसुद्धा रक्तदान केले. रक्तदाते मनीष काळे, दत्तप्रसाद भेले, संदीप आकोलकर, संजय राठी, उज्ज्वल पंचवटे, विजया धंदर, नावेद इकबाल, किशोर गुजर, सरिता काठोळे, संतोष मनवरे, डेहनकर, संतोष घुगे, श्रीकांत खाजोने, नावेद इकबाल, विकास रेखाते, मंगेश ठाकरे, प्रविण ढोके, गजानन सानप, प्रकाश देशमुख, अमोल शेंबे आदींचा सहभाग होता.
रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात शनिवारी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली. अधिकारी, कर्मचारी क्रीडा महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी प्रथम नोंदणी करून सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली
ठळक मुद्देक्रीडा महोत्सव । सीईओंसह ६१ रक्तदात्यांचे रक्तदान