शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:54 IST

मोकाट कुत्र्यांमुळे शाळेत ये-जा करणारी लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर नियंत्रणाकडे अचलपूर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनगरपालिका प्रशासन सुस्त । अनेकांना चावा; मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : अचलपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर, गल्लीत जथ्थ्याने फिरणाऱ्या या कुत्र्यांनी चावा घेतल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत.मोकाट कुत्र्यांमुळे शाळेत ये-जा करणारी लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर नियंत्रणाकडे अचलपूर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.देवडी, चावलमंडी, झेंडा चौक, गांधी पूल, विलायतपुरा, बिलनपुरा, जीवनपुरा, विदर्भ मिल, अचलपूर नाका, चौधरी मैदान, टक्कर चौक या मुख्य भागात कुत्र्यांचे कळपचे कळप रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसतात. देवडी, चावलमंडी, विलायतपुरा, गांधी पूल या भागातील मटण मार्केट, हॉटेलसमोर या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. येथे उर्वरित साहित्य रस्त्यालगत टाकले जात असल्याने त्यावर ताव मारण्यासाठी मोठ्या संख्येत मोकाट कुत्री येरझारा मारीत असतात. 

बाहेरची कुत्री; चावे वाढलेअचलपुरात बाहेरून आणून कुत्रे सोडण्यात आल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. अचानक कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण त्यांचे आहे. दिवसभर ही मोकाट कुत्रे सैरावैरा पळत असतात. गाड्यांच्या मागे धावतात. बाजारात जाणारी मुले, वृद्ध यांच्या अंगावर जाऊन चावा घेण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. दररोज अशा रुग्णांची संख्या उपजिल्हा रुग्णालयात बरीच असते.नगरपालिका फक्त आश्वासन व आवाहन करून त्यापलीकडे कोणतेही पावले उचलताना दिसत नाही. रात्रीच्या वेळेस कुत्र्यांचा सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे. याशिवाय कुत्र्यांच्या विष्ठेने सर्वत्र घाण दिसून येत आहे.