अंजनगाव सुर्जी : पतंजली योग समिती व लोकजागरच्यावतीने डॉक्टरांच्या चमूचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, हरिसालच्या दिवंगत वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
माजी वैद्यकीय अधिकारी कोकाटे यांनी कोरोनासंबधी समज गैरसमज यावर मार्गदर्शन केले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे यांनी कोरोना तपासणी व लसीकरणचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक संगीता मेन यांनी केले. संचालन प्रमोद निपाणे यांनी केले. कार्यक्रमाला माजी आमदार रमेश बुंदेले, डॉ. कोकाटे, डॉ. कविटकर, डॉ. गजानन गांधी, डॉ. अमिन खान, डॉ. फरकुंदा शेख, डॉ. शाहीद राजा, डॉ. दाभाडे, डॉ. मंगेश राऊत, डॉ. लोखंडे, डॉ. सरोदे, डॉ. अनिस जलील, डॉ. मोहन काळे, डॉ. अतुल डकरे, डॉ. स्पृहा डकरे, डॉ. भोरे, डॉ. त्रिवेणी वडनेरकर, डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. संजय होरे, डॉ. मधुसूदन सारडा, डॉ. वैभव हाडोळे, डॉ. पटेल, डॉ. युवराज पाटील यांच्या चमूला पतंजली व लोकजागरचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. काळे व डॉ. कविटकर यांनी मनोगत व्यक्त केले.