महाराष्ट्रातून रेल्वेने काही राज्यांमध्ये प्रवास करताना प्रवाशांना कोरोना चाचणीचा ‘आरटी-पीसीआर निगेटिव्ह’ अहवाल प्रवासादरम्यान सोबत बाळगणे अनिवार्य आहे. बहुतांश रेल्वे प्रवासी गाड्या आता रुळावर आल्या. प्रवाशांची संख्यादेखील वाढली. तेव्हा प्रवाशांनी नियमांना बगल देऊ नये, अन्यथा नाहक फजितीला सामोरे जावे लागेल.
बडनेरा रेल्वे स्थानकावरून आता पूर्वीप्रमाणेच रेल्वेगाड्या धावत आहेत. बोटावर मोजण्याएवढ्या गाड्या सुरू होणे बाकी आहे. काही गाड्या सुरू करण्याची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाकडून होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्यापैकी ओसरला आहे. प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपली व इतर प्रवाशांची काळजी घेण्यासाठी प्रवाशांनी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल तसेच लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र प्रवासादरम्यान बाळगणे आवश्यक आहे. प्रामुख्याने केरळ, गोवा, गुजरात तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांनी उपरोक्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यापासून संसर्ग पसरू नये, यासाठी रेल्वे प्रशासनासह जिल्हा प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. वेळेवर फजिती होण्यापेक्षा प्रवाशांनी काळजीने व नियम पाळून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन करीत आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना आपल्याच राज्यात प्रवास करताना मात्र आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल बाळगणे सक्तीचे नाही. काही राज्यांमध्ये गेल्यानंतर बऱ्याच प्रवाशांना स्वतःकडे कोरोना अहवाल नसल्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा खबरदारी बाळगण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
--------- ------------
* सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या*
1) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
2) विदर्भ एक्स्प्रेस
3) गीतांजली एक्स्प्रेस
4) हावडा-मुंबई मेल
5) आझाद हिंद एक्स्प्रेस
6) अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस
7) हावडा-अहमदाबाद-हावडा
8) कुर्ला-हटिया
---------------------
* या रेल्वे गाड्या कधी सुरू होणार?*
1) शालिमार एक्स्प्रेस
2) अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस
3) पॅसेंजर रेल्वे गाड्या
4) अमरावती-पुणे व्हाया लातूर
5) अमरावती-नागपूर इंटरसिटी
---------------------
बॉक्स : पॅसेंजर कधी सुरू होणार?
अमरावती-बडनेरा रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करणाऱ्या तसेच अगदी जवळपासच्या गावखेड्यांवरील प्रवाशांसाठी पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू होणे गरजेच्या आहेत. तशी मागणीदेखील आहे बीड, खंडवा या भागात लोकल ट्रेन सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्याच धर्तीवर विदर्भातदेखील पॅसेंजर गाड्या सुरू कराव्या, ज्यामुळे बऱ्याच रेल्वे प्रवाशांना त्यापासून मोठा दिलासा मिळेल. वाढती मागणी पाहता रेल्वे प्रशासनाने याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे.
-------------------
बॉक्स : मुंबई मार्गाकडे आरक्षण मिळेना.
महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा असर बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर या मोठ्या शहरांमधून मुंबईकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याची स्थिती आहे. अमरावती-मुंबई, विदर्भ एक्स्प्रेस या गाड्या सध्या हाऊसफुल धावत आहेत. मुंबईप्रमाणेच पुण्याकडेदेखील प्रवाशांची रेल्वे गाड्यांवर गर्दी पाहावयास मिळत आहे.
---------------------
बॉक्स: दुसऱ्या राज्यात जाताना दोन्ही प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक.
बहुतांश दुसऱ्या राज्यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांना कोरोणाची rt-pcr नेगेटिव टेस्ट तसेच लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य केले आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हा नियमच आखून दिलेला आहे.
---------------
प्रतिक्रिया-
कोरोणा rt-pcr निगेटिव्ह टेस्ट अहवाल तसेच लसीकरण प्रमाणपत्र प्रत्येक प्रवाशाने प्रवास करताना स्वतःकडे बाळगणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शासन व प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
पी. के. सिन्हा
स्टेशन मास्तर, बडनेरा.