शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन बससाठी एसटीला प्रवासी देता का प्रवासी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:01 IST

एसटी महामंडळाने त्यासाठी पर्यटन बसेस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पर्यटन बस लवकरच दर शनिवार आणि रविवार या  सुट्टीच्या दिवशी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा,मुक्तागिरी आणि शेगाव या ठिकाणी  एसटी महामंडळाची दर्शन बस धावणार आहे. या दिवाळीपासून रविवारी आणि सुटीच्या दिवशी सकाळी  अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावरून निघणाऱ्या त्या बसेसमध्ये चिखलदारा, मुक्तागिरी, शेगाव आदी ठिकाणी सकाळी जाऊन संध्याकाळी परत अमरावती व परतवाडा बसस्थानकात येणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळामार्फत अमरावती व परतवाडा एसटी आगारामधून  तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ दर्शनाकरीता  दर शनिवार आणि रविवार या दोन दिवस सुट्यांच्या कालावधीत दर्शन बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळाच्या या बसेस बंद आहेत. अशातच आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर शासनाने धार्मिक स्थळे खुली केली आहेत. त्यामुळे भाविक आता धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळी जाऊ शकणार आहेत. त्यामुळे बंद असलेल्या दर्शन बसेस सुरू   कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. एसटी महामंडळाने त्यासाठी पर्यटन बसेस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पर्यटन बस लवकरच दर शनिवार आणि रविवार या  सुट्टीच्या दिवशी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा,मुक्तागिरी आणि शेगाव या ठिकाणी  एसटी महामंडळाची दर्शन बस धावणार आहे. या दिवाळीपासून रविवारी आणि सुटीच्या दिवशी सकाळी  अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावरून निघणाऱ्या त्या बसेसमध्ये चिखलदारा, मुक्तागिरी, शेगाव आदी ठिकाणी सकाळी जाऊन संध्याकाळी परत अमरावती व परतवाडा बसस्थानकात येणार आहेत. दीड वर्षांपासून बंद असलेल्या महामंडळाच्या बसेस अनलॉकनंतर सुरू झाल्या. मात्र, आता सर्वच ठिकाणी बसफेऱ्या सुरू झालेल्या आहेत. त्याला प्रवाशांचा आका सणासुदीच्या दिवसात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

सतत होत आहे मागणीधार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यटन बसेस सुरू केल्या होत्या. पर्यटन बसेसला चांगला प्रतिसादही मिळाला. या बसमध्ये शंभर टक्के बुकिंग होत होती. परंतु कोरोनामुळे बस बंद कराव्या लागल्या. आता धार्मिक स्थळे खुली करण्याचा आदेश आल्यानंतर या बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत होती. एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की काऊंटरला प्रवासी या विषयाची माहिती घेण्यासाठी येत आहेत.

ऑनलाईन बुकिंग करता येणारधार्मिक स्थळांवर जाण्यासाठी एसटी बस स्थानकावरून पर्यटन बस सुटणार आहे. सुरुवातीला एका बसची बुकिंग होईल. भाविकांना व पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे. पर्यटन बसचे भाडे नियमानुसार आकारले जाणार आहे. बसमध्ये ४४ प्रवासी असतील. प्रवाशांची संख्या वाढल्यास अधिक बसेस सोडण्यात येईल.

प्रवाशांची मागणी

सुट्या असतात. त्यामुळे सुटीच्या दिवसी पर्यटन व तीर्थस्थळ दर्शनाकरीता महामंडळाने दर शनिवार आणि रविवारी सुरू केलेली दर्शन बस  कोरोनामुळे बंद केली होती. ती पुन्हा सुरू करावी.आशिष मानकर, प्रवासी

एसटी महामंडळाने गत दीड वर्षापासून महामंडळाच्या सुटीच्या दिवशी धावणाऱ्या दर्शन बस बंद केल्या होत्या. आता कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे तसेच सणासुदीचे व सुट्यांचे दिवस लक्षात घेता या बसेस सुरू कराव्यात.हर्षिता कावरे, प्रवासी

एसटी महामंडळामार्फत पर्यटन बसची मागणी सातत्याने होत आहे. आता धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे सुरू झाल्यामुळे या बसेस सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. लवकरच या बसेस पर्यटन व धार्मिक स्थळी सोडण्यात येणार आहेत.संदीप खवडे, आगार व्यवस्थापक अमरावती

 

टॅग्स :tourismपर्यटनstate transportएसटी