अमरावती : ई-फेरफार प्रणालीमुळे दस्तनोंदणी आणि फेरफार नोंद घेण्याची प्रक्रिया एकत्रित झाली आहे. ज्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज पडत नाही. प्रक्रिया जलद गतीने होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जानेवारीअखेर जिल्ह्यात ५६ हजारांवर फेरफार निर्गत झाले आहे. या प्रक्रियेत राज्यात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.
शेतजमिनीच्या फेरफाराची प्रचलित हस्तलिखित पद्धत आता बंद झालेली आहे. महसूल विभागात ई-गर्व्हनन्सनुसार कामे होत असल्याने वित्त विभाग वगळता सर्व नोंदी ऑनलाइन घेतल्या जात आहेत. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे. त्याआधारे गावपातळीवरून होणारी ई-फेरफारची प्रक्रिया ऑनलाइन केलेली आहे.
तालुकास्तरावरील तहसीलदार कार्यालये, दुय्यम निबंधक कार्यालये, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालये आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालये यांना सुरक्षित संगणकीय नेटवर्कद्वारे जोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आलेली आहे.
नागरिकांना ई-फेरफारसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर 'ई-हक्क' या सेवेद्वारे मालमत्ता पत्रक नोंदणी व फेरफार अद्ययावत करण्यासाठी अर्ज करता येत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
काय आहेत फायदे?
- ई-फेरफार अंतर्गत वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, करार नोंदी, मृताचे नाव कमी करणे, अज्ञान पालनकर्त्याचे नाव कमी करणे, एकत्र कुटुंब प्रमुखाचे, विश्वस्तांचे नाव कमी करणे या आठ प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे.
- ई हक्क प्रणालीमुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल कार्यालयात आता चकरा माराव्या लागत नाहीत. तलाठी कार्यालयातील अडचणी ऑनलाइनमुळे बाद झाल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणेलाही आता सोयीचे झाले आहे.
जिल्हा स्थितीजानेवारीअखेर फेरफार नोंदी - ७५६३६नोंदविलेले फेरफार - ५६३४६प्रलंबित फेरफारची संख्या - २०३२प्रमाणित फेरफार नोंदी - ११००२६निर्गतीसाठी सरासरी दिवस - १६