शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वाहन न दाखवताच घ्या ‘पीयूसी’

By admin | Updated: January 21, 2015 23:59 IST

शहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘पीयूसी’ केंद्रांकडून देण्यात येते.

लोकमत चमू अमरावतीशहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘पीयूसी’ केंद्रांकडून देण्यात येते. मात्र, ‘पीयूसी’देताना पाळावयाचे निकष धाब्यावर बसवून ‘वाहन क्रमांक सांगा आणि पीयूसी घेऊन जा’ असा प्रकार सर्रास सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघड झाले. प्रादेशिक परिवहन विभागाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताच अंकुश नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी शहरातील अनेक भंगारावस्थेत पडून असलेल्या वाहनांची ‘पीयूसी’ या केंद्रांकडून केवळ वाहनक्रमांक सांगून अगदी सहजरीत्या मिळविली. शहरातील वाढत्या प्रदूषणाची कारणमीमांसा या स्टिंग आॅपरेशनंतर अगदी सहजरीत्या करता येईल. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यात फिरते आणि स्थायी स्वरूपाचे एकूण १७ ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र’ अधिकृतरीत्या सुरू आहेत. यामध्ये १२ केंद्र शहरात तर ५ केंद्र ग्रामीण भागात कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश केंद्रांवर वाहने न तपासताच पीयूसी देण्यात येते. या प्रकारामुळेच अमरावती शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. वाहनांची अवस्था व ते प्रदूषणरहित आहे काय, याची शहानिशा न करताच ‘पीयूसी’ दिली जात असल्याने अमरावतीकरांच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे.स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयवेळ :१.३५जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धूळ खात पडलेल्या कार एम.एच.२७-ए.ए.-५ वाहनाचे छायाचित्र आमच्या छायाचित्रकाराने टिपले. त्यानंतर काही वेळातच आरटीओ कार्यालयासमोर असणाऱ्या एका पीयूसी केंद्रावर वाहन न आणताच त्याच वाहनाची ५० रुपये देऊन पीयूसी काढली. ही संशयास्पद वाटल्याने केंद्र संचालकाने ‘लोकमत’ प्रतिनिधीकडून ती पीयूसी काढून घेतली. पैसे परत केले. यावरून भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेस्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय दि.-१९ जानेवारीवेळ : दुपारी १२.१५ वाजताजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार एम.एच.-२७-ए.ए.-११११ या वाहनाचे हे छायाचित्र. शहरातील दुसऱ्या पीयूसी केंंद्रावर जाऊन वाहन न दाखविता या वाहनाची पीयूसी मिळविली. त्यावेळी केंद्रावरील कर्मचाऱ्याने वाहन कुठे आहे, असा प्रश्न केला. पण नंतर लगेच प्रमाणपत्र दिले.